पेन्शनरांचा लॉकडाऊन लई भारी चाललाय : ऑनलाईन क्विझला उस्फूर्त प्रतिसाद

दुर्गादास रणनवरे
Saturday, 25 April 2020

कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे घरात बसून अनेकजण कंटाळले आहेत. परंतु यातूनही काहीतरी नाविन्यपूर्ण करावे अशी आयडिया ई-एसबीएच पेन्शनर्स असोसिएशनचे प्रमोद बेंडे यांना सुचली आणि त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक ऑनलाईन क्विझ सुरू केली.

औरंगाबाद : कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे घरात बसून अनेकजण कंटाळले आहेत. परंतु यातूनही काहीतरी नाविन्यपूर्ण करावे अशी आयडिया ई-एसबीएच पेन्शनर्स असोसिएशनचे प्रमोद बेंडे यांना सुचली आणि त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक ऑनलाईन क्विझ सुरू केली. या स्पर्धेत देश विदेशातील एसबीएचचे निवृत्त सभासद सहभागी झाले असून, या क्विझचा आनंद लुटत आहेत.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

दररोज दुपारी साडे चार ते पाच या वेळेत ही ऑनलाईन क्विझ घेतली जाते व प्रमोद बेंडे क्विझमधील सहभागी स्पर्धकांना एक प्रश्न विचारतात. त्या प्रश्नाचे उत्तर स्पर्धक गटाने 30 सेकंदात द्यायचे, असा या स्पर्धेचा नियम आहे. विविध विषयांवरील प्रश्न या क्विझमध्ये विचारले जातात. सभासद त्यांची उत्तरे ऑनलाईन ग्रुपवरच पाठवितात, असे प्रमोद बेंडे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण घालण्याऐवजी यांनी...

अमेरिकेतील दोघांसह राज्यातील अनेकांचा सहभाग

अमेरिकेतील 2, तसेच पुणे, औरंगाबाद, हिंगोली, बीड आदी ठिकाणचे सभासद या क्विझमध्ये सहभागी झालेले आहेत. पाच- पाच स्पर्धकांचा एक गट या स्पर्धेसाठी करण्यात आला आहे. घरात बसून आम्ही लॉकडाऊनच्या नियमांचेही पालन करतो. घरी बसून बोअर न होता बुद्धीला चालना देणे आणि सामान्य ज्ञानात भर पडावा, तसेच सेवा निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य आनंदाने आपल्या कटुंबियासोबत एकत्र घालवावे. तसेच कुणाच्याही मनात नैराश्याची भावना निर्माण होऊ नये, हाच आमचा ही ऑनलाईन क्विझ घेण्याचा उद्देश असल्याचेही प्रमोद बेंडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Quiz For Pensioners In Lockdown Aurangabad News