कोरोनाबाधित रुग्णांसाठीच राखीव ठेवा घाटीतील ‘बेड’ 

राजेभाऊ मोगल
Friday, 27 March 2020

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. ज्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी तर झालाच; शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासही मदत झाली. कर्नाटक सरकारने हे चीन मॉडेल वापरण्याचे आदेश आपल्या सरकारी यंत्रणेला दिले आहेत. 

औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून घाटी रुग्णालयात फक्त कोरोनाबाधित रुग्णांवरच उपचार करता यावेत यासाठी येथील ‘बेड’ राखीव ठेवावेत व येथील अन्य आजारांच्या रुग्णांना इतर सरकारी व खासगी रुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.२७) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

हेही वाचा : गुढीऐवजी उभारा भगवी पताका

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, की चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. ज्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी तर झालाच; शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासही मदत झाली. कर्नाटक सरकारने हे चीन मॉडेल वापरण्याचे आदेश आपल्या सरकारी यंत्रणेला दिले आहेत.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..

यासाठी तेथील मुख्य राज्य रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी १७०० ‘बेड’ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच रुग्णालयातील अन्य आजार असलेल्या रुग्णांना इतर खासगी व सरकारी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांची अधिक चांगल्या पद्धतीने काळजी तर घेता येईल; शिवाय कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असे आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

आढळल्या कमतरता 
दरम्यान, आमदार चव्हाण यांनी घाटी रुग्णालयास भेट दिली असता त्यांना त्या ठिकाणी बऱ्या‍च कमतरता दिसून आल्या. घाटी प्रशासनाने अत्यावश्यक वस्तू पुरवण्याची मागणी सरकारकडे केली होती; मात्र अद्यापही या वस्तूंची पूर्तता झाली नसल्याचे घाटी प्रशासनाने यावेळी आमदार चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा : कोरोनामुळे मिळेना शालेय पोषण आहार..  

आमदार चव्हाण यांनीही त्वरित आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व या वस्तू पुरवण्याची जबाबदारी ज्या हाफकिन इन्स्टिट्यूटवर आहे त्याचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घाटी प्रशासनाला लागणारे चांगल्या क्वॉलिटीचे मास्क, डॉक्टरांसाठी स्वसंरक्षणात्मक पोशाख आदींसह इतर अत्यावश्यक वस्तूंची त्वरित पूर्तता करण्याची मागणी केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only for coronavoid patients Reserve 'beds' in the Ghati.