esakal | अन्यथा औरंगाबाद शहरात असते सात हजार रुग्ण..!
sakal

बोलून बातमी शोधा

corona image.jpg

काय केले महापालिकेने? 

  • शहरात येणाऱ्या सुमारे चार लाख प्रवाशांचे आतापर्यंत स्क्रीनिंग. 
  • सुमारे तीनशे वसाहतीमध्ये रुग्ण आढळताच आरोग्य तपासणी. 
  • पाच लाख ७० हजार नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी. 
  • १३ हजार ८०० संशयितांचे घेतले स्वॅब. 
  • 'माझे आरोग्य माझ्या हाती’ या अॉपद्वारे १३ हजार नागरिकांच्या नोंदी

अन्यथा औरंगाबाद शहरात असते सात हजार रुग्ण..!

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : जून महिन्यात शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल सात हजार एवढी राहील, असा अंदाज केंद्र शासनाने व्यक्त केला होता. मात्र, सुमारे तीन महिन्यांत शहरात रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेली. महापालिकेच्या प्रयत्नांमुळे रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागला असला तरी मृत्युदर राज्यात सर्वाधिक असल्यामुळे औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे. 

औरंगाबादचा वाढतोय कोरोना मीटर, आज ७२ रुग्ण सापडले, ७८० बाधितांवर उपचारही आहेत सुरू   

शहरात कोरोनाबाधित पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळून आला होता. सुरवातीचे काही दिवस एक-दोन रुग्ण आढळून आल्यामुळे महापालिका प्रशासन बिनधास्त होते. मात्र एप्रिल, मे व त्यानंतर रुग्णांची संख्या झापट्याने वाढली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधी राज्य शासनाने व नंतर केंद्र शासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला. याचवेळी ज्या शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा  

तिथे पुढील काही काळात रुग्णसंख्या किती होऊ शकते, याचे अंदाज बांधण्यात आले होते. ही आकडेवारी पाहून सर्वांनाच धडकी भरली होती. या अंदाजानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबाद शहराची रुग्णसंख्या सात हजारपर्यंत जाण्याचा धोका होता; पण महापालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या रोखण्यात काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, औरंगाबादचा मृत्युदर राज्यात सर्वाधिक म्हणजे सरासरी ५.४ एवढा आहे, तर राज्याचा मृत्युदर सरासरी तीन टक्के एवढा आहे. 

रिकामे हात अन् हवालदिल मन...मजुरांची अशीही व्यथा   

दहशत कायम  
राज्यातील काही शहरांत रुग्णांचे आकडे कमी होत असताना मुंबईपाठोपाठ औरंगाबादेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे, तर दुसरीकडे कोरोनाची दहशत वाढत आहे. 


एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने संपर्कातील नागरिकांना क्वारंटाइन करण्याचा धडाका सुरू केला आहे. एकाच दिवसात ३३८ जणांना क्वॉरंटाइन केले आहे.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी (ता.१०) दिवसभरात जिल्ह्यात १२१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे.