पाणी पिताना सहा म्हशींवर विद्युतवाहिनी पडल्याने तडफडून मृत्यू; महावितरणची दिरंगाई पुन्हा दिसली

electricity
electricity

पैठण (औरंगाबाद): पैठण शहरालगत पाचोड रोडवरील ओढ्याच्या डोहात मोठा अपघात घडला. या घटनेत शनिवारी दुपारी पाणी पिण्यासाठी उतरलेल्या म्हशींवर विद्युतवाहिनी तुटून पडल्याने सहा म्हशी मरण पावल्या आहेत. विषेश म्हणजे सुदैवाने या अपघातात एक गाय वाचली आहे. पण, पाण्यामधून विद्युत शॉक बसल्याने सध्या गाय अर्धमेल्या अवस्थेत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी या गायीवर उपचार करत आहेत. मृत झालेल्या इतर सहा म्हशी एकाच मालकाच्या असल्याने मालकावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. 

नेहमीप्रमाणे चरण्यासाठी शहरातील शंकर सदाशीव काटकर ( रा. इंदिरानगर ) यांच्या मालकीच्या पाच म्हशी, एक रेडा व एक गाय पाचोड रोडवरील वनवे जिनिंग पाठीमागील परिसरात सोडल्या होत्या. दरम्यान, गाय वगळता सर्व जनावरे परिसरातील ओढ्यात उतरली होती. जनावरे पाण्यात असताना दुर्देवाने ओढ्यावरून जाणारी विद्युतवाहिनी अचानक तुटून पाण्यात पडली. विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने पाण्यातील सहाही म्हशी तडफडून मरण पावल्या.

ओढ्याच्या कढ्यावर असलेल्या गायीला सुद्धा विद्युत धक्का बसला असून ती सध्या अर्धमेल्या अवस्थेत आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के, नगरसेवक ईश्वर दगडे व इंदिरानगर भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विद्युत पुरवठा बंद करून ट्रक्टरच्या सहाय्याने म्हशींचे शव पाण्याबाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निवास भुजंग यांनी म्हशींचे शवविच्छेदन केलं.

एकाच वेळी सहा म्हशी गेल्याने काटकर यांच्या परिवारावार मोठं संकट आलं आहे. महावितरणने संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के यांनी केली आहे.

फोन आला नसता तर...
शेतकरी शंकर काटकर यांचा मुलगा म्हशी पाठीमागे होता. म्हशी पाण्याबाहेर काढण्यासाठी तो डोहात चालला होता पण मोबाईलवर कॉल आल्याने तो पाण्यात गेला नाही. तेवढ्यातच हा अपघात घडला. मोबाईलवर आलेल्या फोनमुळे तो दूरवरच बोलत थांबला होता. याच वेळेस पाण्यात विद्युतवाहिनी तुटून पडली. फोन आल्यामुळे काटकर यांच्या मुलाचे प्राण वाचले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com