पालकांनो सावधान! मुलांना मोबाईल देताय, आधी हे वाचा, औरंगाबादेत घडले भयंकर!  

सुषेन जाधव
Saturday, 24 October 2020

औरंगाबादेतील एका मुलीला इन्स्टाग्रामवर फोटो मागवून घेत ब्लॅकमेल करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली असून असे प्रकार टाळण्यासाठी पोलिस विभागाकडून पालकांनीच दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : मागच्या तब्बल सात आठ महिन्यापासून कोरोनाच्या काळात मुलांना मैदानावर जाऊन मनसोक्त खेळता येत नव्हते. सध्याही अपेक्षित परिस्थिती नाही, यामुळे घरात मुलांचा कल मोबाईलकडे वाढणे साहजिकच आहे, मात्र आपली मुलं-मुली मोबाईलचा वापर नेमका कशासाठी, कसा करतात, यातून वेगळ्यात मार्गाला तर लागत नाहीत ना? सोशल मिडीयाचा वापराचे बंधन नसणे, वापराविषयी माहिती नसणे यातून बरेच दुष्परिणाम समोर आले आहेत. औरंगाबादेतील एका मुलीला इन्स्टाग्रामवर फोटो मागवून घेत ब्लॅकमेल करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली असून असे प्रकार टाळण्यासाठी पोलिस विभागाकडून पालकांनीच दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मोहम्मद सोहेब मोहम्मद सलीम असे त्या गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. मोहम्मदविरोधात सायबर पोलिस ठाण्यात विविध कलमांसह पोस्कोनुसार गुन्हाही दाखल आहे. संशयित मोहम्मद याने इन्स्टाग्रामवर फेक खाते तयार केले, सदर गुन्ह्यातील पिडीत मुलीला मित्र विनंती पाठविली. पिडीतेने विनंती स्विकारली. त्यानंतर संशयित मोहम्मद याने तिला तिचे फोटो पाठवण्यासाठी उद्यूक्ता केले. पिडीतेला बनावट खाते असल्याचा संशय न आल्याने तिने फोटोही पाठविले मात्र, त्याने पिडीतेला व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणात पोलिसांत धाव घेण्यात आली. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद याला सायबर पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. दिनेश कोल्हे यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशी केली जाते बदनामी

अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलं -मुली मोबाईल, इंटरनेट वापरताना त्यावर लक्ष ठेवावे. त्यांना विश्‍वास घेऊन अशा गोष्टी सांगाव्यात. अनोळखी व्यक्ती व्यक्ती हे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आदि सोशल मिडीयाच्या माध्यमातून महिला, मुली असल्याचे भासवून मैत्री करतात. त्यांच्यासोबत अश्‍लील चॅटींग करतात, त्यांच्याशी व्हिडीओ कॉलवरुन रेकॉर्डिंग करुन नंतर अश्‍लील चॅटिंग, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करतात. मुलांचे हट्ट पुरवताना या गोष्टी लक्षात घ्याव्यात तसेच आपल्या पाल्याच्या सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये गुगल फॅमिली लिंक अॅप इन्स्टॉल करा, याच्या माध्यमामातून मुलं मोबाईलचा वापर कसा करतात यावर लक्ष ठेवता येऊ शकेल असेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents beware give mobile to children then read this news