esakal | औरंगाबादेत ऑईल डेपो सुरु करण्यासाठी पेट्रोलियम समितीची चाचपणी
sakal

बोलून बातमी शोधा

2Sakal_20News_11

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला ऑईल डेपो शहरात सुरु करण्यासाठी इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांच्या समिती सदस्यांनी औरंगाबादेत बुधवारी (ता.१५) भेट दिली.

औरंगाबादेत ऑईल डेपो सुरु करण्यासाठी पेट्रोलियम समितीची चाचपणी

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला ऑईल डेपो शहरात सुरु करण्यासाठी इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांच्या समिती सदस्यांनी औरंगाबादेत बुधवारी (ता.१५) भेट दिली. खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे यांनी समिती सदस्याची भेट घेऊन ऑईल डेपो सुरु करण्याबाबत (फिजीबिलीटी) माहिती दिली.

उद्धव ठाकरेंनी फक्त बांद्राचे मुख्यमंत्री न राहता महाराष्ट्राचा विचार करावा, भाजपचे माजी मंत्री निलंगेकरांचा सल्ला

राज्यात इतर विभागांना दोन ऑईल डेपो असताना मराठवाड्यात एकही ऑईल डेपो नाही. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, ड्रायपोर्ट, डीएमआयसी आणि वाहनांची वाढती संख्या याविषयी समिती सदस्यांना माहिती दिली. यावेळी समिती सदस्यांनी ऑरिक सिटी भेटही दिली व डीएमआयसी प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली. खासदार डॉ.भागवत कराड केंद्रीय पेट्रोलियम स्थायी समितीचे सदस्य असून, त्यांनी मराठवाडयाच्या विकासासाठी औरंगाबादेत ऑईल डेपो सुरु करावा, अशी मागणी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, स्थायी समिती अध्यक्ष रमेश बिधुरी यांच्याकडे केली होती.

औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेकडून तोडफोड

त्यानंतर तेल कंपन्यांच्या चेअरमननी मुंबई कार्यालयास औरंगाबादेत डेपोसाठी फिजीबलीटी रिपोर्ट देण्यासंदर्भात सूचना केली होती. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आयओसी समितीचे एस.के. रविकुमार, रणबीर सिंग, अजय श्रीवास्तव, औरंगाबादचे प्रादेशिक अधिकारी सुहास तुमाने यांची उपस्थिती होती. खासदार डॉ. कराड यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना ऑईल डेपोसाठी शंभर एकर जागा देण्यासंदर्भात मागणी केली होती व त्यांनी रेल्वेलाईनजवळ जागा शंभर ते दीडशे एकर जागा देण्याविषयी सहमती दर्शविली होती. दरम्यान, शहरात ऑईल डेपो सुरु झाला तर औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर