पाथरीत साईजन्मस्थळाला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा !

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

औरंगाबाद : औरंगाबादसह विभागातील पत्र्याचे छत व मोडकळीस आलेल्या शाळांना नवीन इमारती बांधून दिल्या जातील. तसेच साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीसाठी विकास आराखडा तयार केलेला आहे. लवकरच तेथे भूमिपूजन होणार असून तीर्थक्षेत्र म्हणून ते विकसित करू, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केली. तसेच पर्यटन, दळणवळणासाठी आवश्‍यक असलेल्या औरंगाबाद-शिर्डी आणि औरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या कामांनाही गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

विभागीय आयुक्‍त कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी गुरुवारी (ता. नऊ) उस्मानाबाद, परभणी व औरंगाबाद अशा तीन जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की आपण जिल्हावार समस्या जाणून घेत आहोत. एका बाजूला जिल्ह्यातील आमदार, खासदार असे लोकप्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन अशा एकत्रित झालेल्या बैठकीत मांडलेले प्रश्‍न तिथल्या तिथेच सोडविण्याचा हा प्रयत्न आहे.

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

पीकविमा योजनेबाबत काही उणिवा आढळलेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी कंपनींच्या प्रतिनिधींसोबत लवकरच संवाद साधून शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत, यासाठी लवकरच मार्ग काढण्यात येईल. सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीकविमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा झाली.

जाणून घ्या मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

औरंगाबादच्या विकासाला प्राधान्य आहे. जिल्ह्याच्या विकासाला आवश्‍यक असणाऱ्या सर्व सुविधा, आवश्‍यक बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. 
बैठकीस उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, आदींसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, सीईओ पवनीत कौर उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pilgrimage status will be given to Pathari BirthPlace Of Saibaba