पिसादेवी ग्रामपंचायतीचे वादग्रस्त प्रशासक चांदवडकर यांना बदलणार ! 

दुर्गादास रणनवरे
Tuesday, 15 September 2020

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी घेतला तात्काळ निर्णय. 

औरंगाबाद : पिसादेवी ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती दिलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील वादग्रस्त शाखा अभियंता सुनिल चांदवडकर यांची नियुक्ती रद्द करुन तिथे तात्काळ दुसरा प्रशासक नियुक्त करण्यात येईल, प्रशासनाने त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे लवकरच येथे नियुक्त केलेल्या प्रशासकाचे नाव येईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुणाचे कुटुंबीय अथवा मुले काय काय "उद्योग" करतात हे प्रशासनाला माहित नसल्याने हा घोळ झाला असावा. परंतु प्रसार माध्यमांनी या विषयी वृत्त परिक्षित केल्यामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने चांदवडकर यांना बदलण्याचा निर्णय घेतल्याचेही डॉ. गोंदावले यांनी "सकाळ" शी बोलतांना सांगितले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

काय होते पिसादेवी येथील वादग्रस्त निविदा प्रकरण? 
औरंगाबाद तालुक्यातील पिसादेवी येथील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत मुलगा समीर चांदवाडकर याने केलेल्या कामाचे बिल उचलण्यासाठी जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील शाखा अभियंता सुनील चांदवडकर यांनी "अर्थ"पूर्ण चर्चा करून पिसादेवी येथील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदावर आपली नियुक्ती व्हावी यासाठी प्रशासनाशी सेटिंग केल्याचा आरोप पिसादेवी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच नर्मदा ताराचंद काळे यांनी होता . याविषयी नर्मदा काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, जिल्हा परिषद औरंगाबाद येथील बांधकाम विभागातील शाखा अभियंता सुनिल चांदवडकर हे वादग्रस्त कर्मचारी असून, पिसादेवी येथील एका कामाचे टेंडर काढून आपला मुलगा समीर चांदवडकर याच्या नावे काम घेऊन काम न करताच या कामाचे पैसे उचलण्याचा प्रयत्न सुनील चांदवडकर हे करत असल्याचा आरोप केला आहे. पिसादेवी येथील आगोदरच झालेल्या कामाचे टेंडर काढले म्हणून जिल्हा परिषद सदस्य संतोष शेजुळ व ग्रामस्थ ताराचंद काळे यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

माजी सरपंच नर्मदा काळे यांनी केली होती तक्रार 

चांदवडकर यांचे अधिकाऱ्यांशी असलेले लागेबांधे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांच्या लक्षात आल्याने, त्यांनी स्वतः वादग्रस्त, न झालेल्या कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की आगोदरच झालेल्या कामाचे टेंडर पुन्हा नव्याणे काढले गेले आहे . म्हणून त्यांनी या वादग्रस्त कामाचे बिल काढण्यास स्थगिती दिली होती.  सदर टेंडर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर चे बिलो असल्याने टेंडर रद्द करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वेळी त्याच कामाचे कोणताही बदल न करता पुन्हा नव्याने टेंडर काढण्यात आले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावेळी सदर टेंडर हे सुनील चांदवडकर यांचा मुलगा समीर चांदवडकर यांच्या नावाने देण्यात आले असा आरोपही नर्मदा काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला होता . सुनील चांदवडकर यांना हे कामं न करताच बिल उचलायचे असल्याने जिल्हा परिषदेतील काही अधिकार्‍यांशी संगनमत करून त्यांनी पिसादेवी येथील ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून स्वतःची नियुक्ती करून घेतली असा खळबळजनक आरोप माजी सरपंच नर्मदा ताराचंद काळे यांनी केला होता व त्यांच्याकडील प्रशासक पदाचा पदभार त्वरित काढून घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा तसेच न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे होता.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pisadevi Gram Panchayat Controversial administrator replaces Chandwadkar