मैत्रिणीशी लग्न लावून दे म्हणत पठ्ठ्याने आजीलाच मागितली खंडणी, पण झालं वेगळंच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

मैत्रीणीसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मैत्रणीच्या आजीला ५० हजारांची खंडणी तसेच मैत्रणीसोबत लग्न लावून देण्याचा तगादा लावणाऱ्या माथेफिरुला शनिवारी (ता.८) सायंकाळी बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जुनेद उर्फ थापा मोहम्मद अली (३८, रा. चाउस कॉलनी, शहाबाजार) असे त्या माथेफिरुचे नाव आहे. 

औरंगाबाद: मैत्रीणीसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मैत्रणीच्या आजीला ५० हजारांची खंडणी तसेच मैत्रणीसोबत लग्न लावून देण्याचा तगादा लावणाऱ्या माथेफिरुला शनिवारी (ता.८) सायंकाळी बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जुनेद उर्फ थापा मोहम्मद अली (३८, रा. चाउस कॉलनी, शहाबाजार) असे त्या माथेफिरुचे नाव आहे. 

हेही वाचा- जेव्हा वकीलच होतो आरोपी....अन् न्यायाधीशांसमोर... 

प्रकरणात ७५ वर्षीय महिलेने तक्रार दिली. तक्रारीनुसार, पिडित महिलेला दोन मुली असुन त्यातील एक मुलगी पती सोबत पुण्याला राहते, तर तीची मुलगी (नात) ही पिडितीकडे राहत होती. पिडितेची नात शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

त्यावेळी तिची ओळख आरोपी मोहम्मद जुनेद याच्याशी झाली. त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर ते एकमेकांना भेटत होते. मात्र आरोपीला दारु, सिगारेट, गांजाचे व्यसन लागले, त्यामुळे पिडितेच्या नातीने आरोपीशी मैत्री तोडली. दरम्यान २०११ मध्ये पिडितेची नात खाजगी नोकरीसाठी दुबईला गेली. 

हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....

मैत्री तोडल्याचा राग धरुन आरोपीने (मैत्रिण) नातीसोबत नकळत काढलेल्या फोटो आधारे पिडित वृद्धेला ५० हजार रुपयांची मागणी तसेच नातीशी लग्न करुन द्या असा वारंवार तगादा लावत होता. तसेच काढलेले फोटो फेसबुक व व्हाट्स अॅपवर टाकुन बदनामी करण्याची वारंवार धमकीही देत होता.

आरोपी दुबईला असलेल्या नातीला देखील वारंवार फोन करुन लग्न करण्यास बळजबरी करित होता. विशेष आरोपीने पिडितेच्या नातीसाठी आलेले दोन विवाह स्थळ देखील पळवून लावले. प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

पोलिस कोठडीत रवानगी 
आरोपीला रविवारी (ता.९) न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीचा मोबाइल जप्त करणे आहे. पिडित महिलेला मदत करणाऱ्यांना तसेच पिडितेसह तिच्या मुलीला व नातीला देखील आरोपी हा जीवे मारण्याची धमकी देत आहे, तसा गुन्हा सिटीचौक व बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल असुन त्यानुसार तपास करणे आहे.

तसेच आरोपी विरोधात महिलेच्या घरात घुसून तिच्यासोबत अश्लिल चाळे केल्या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी आरोपीला सोमवारपर्यंत (ता.१०) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Custody To Accused Aurangabad News