बाजार समितीत सुरू झाले विकासकामांवरून राजकारण

प्रकाश बनकर
Sunday, 16 August 2020

बाजार समितीत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आरोप-प्रत्यारोपांसह प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न काही संचालकांतर्फे केला गेल्याचा प्रकारही घडला आहे. एवढेच नव्हे, तर आता कोणतीही निवडणूक नसताना बाजार समितीत काँग्रेस व भाजप आपआपली ताकत दाखवत आहेत.

औरंगाबाद : बाजार समितीत अडीच वर्षांनंतर पुन्हा भाजप-काँग्रेसचे राजकारण रंगू लागले आहे. ५ ऑगस्टला बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपली. त्यानंतर समितीचा कारभार आता प्रशासकांच्या हाती देण्यात आला आहे.

भाजप मुदतवाढीसाठी न्यायालयात गेले तर काँग्रेसने प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. भाजप अडीच वर्षांत केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे, तर काँग्रेसकडून काही कामे बंद पाडण्यात आल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात येत आहे. 

हेही वाचा-  Good News : अँकर इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग उद्योग ‘ऑरिक’मध्ये आणण्याचा प्रयत्न (Video पहा)  

बाजार समितीत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आरोप-प्रत्यारोपांसह प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न काही संचालकांतर्फे केला गेल्याचा प्रकारही घडला आहे. एवढेच नव्हे, तर आता कोणतीही निवडणूक नसताना बाजार समितीत काँग्रेस व भाजप आपआपली ताकत दाखवत आहेत.

हेही वाचा- बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या  

गेल्या अडीच वर्षात बाजार समितीचे रूप पालटले आहे. करमाड येथील उपबाजारपेठही आधुनिकरीत्या उभारण्यात आली आहे. यात गेल्या संचालक मंडळाच्या काळात आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले होते.

माजी खासदार चंद्रकांत खैरे व विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनीही एकमेकांवर आरोप केले होते. आता प्रशासक येण्यापूर्वी ठेकेदाराला देण्यात येणाऱ्या धनादेशावरून भाजप आणि काँग्रेस संचालकांचा गोंधळ झाल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यानंतर रस्त्याच्या कामातही काही संचालकांनी अडथळा आणला. 

हेही वाचा- सरकारने कोरोनाची भीती दाखवात जनतेला फसवले - संजय केणेकर   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics In Auranngabad APMC about Development Works Marathi News