आत्मनिर्भर झाला..! अन् सोनूच्या डोळ्यांत आनंदाश्रूचा बांध फुटला...

दुर्गादास रणनवरे 
Sunday, 2 August 2020

सायकलमध्ये बसताच दिव्यांग सोनू भावुक झाला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. फार वर्षांपासून माझी तीनचाकी सायकल घेण्याची इच्छा होती. ती आज जगदीश भैया आणि त्यांच्या मित्रांच्या मदतीमुळे पूर्ण झाली म्हणत त्याने सर्वांचे आभार मानले. 

औरंगाबाद : कोरोना महमारीमुळे धडधाकट व्यक्तींचे रोजगार गेल्याने हजारो बेरोजगार झाले आहेत. तिथे दिव्यांगाचे काय? असा प्रश्न न पडला तर नवलच; परंतु अशाच एका दिव्यांग व्यक्तीला दैनंदिन जीवनात कामधंदा करताना होणारी अडचण सोडविण्यासाठी येथील जगदीश अग्रवाल आणि त्यांच्या मित्रांनी त्या दिव्यांगाला तीनचाकी सायकल भेट देऊन आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  

जयभवानीनगर येथील पंचवीसवर्षीय दिव्यांग सोनू बुट्टे हा जन्मतः दिव्यांग आहे. त्याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सोनू बुट्टे याची धडपड सुरू असते; परंतु हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला तीनचाकी सायकल आजपर्यंत खरेदी करता आली नाही. याची माहिती अग्रवाल समाजातील जगदीश अग्रवाल यांना कळाली. त्यांनी मित्रांची सहमती घेत मुकेश अग्रवाल, कैलास अग्रवाल, अजय ऐरण, दीपक अग्रवाल यांच्या मदतीने सोनूला ही भेट दिली. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

...अन् सोनूच्या डोळ्यांत आनंदाश्रू 
सायकलमध्ये बसताच सोनू भावुक झाला. फार वर्षांपासून माझी तीनचाकी सायकल घेण्याची इच्छा होती ती आज जगदीश भैया आणि त्यांच्या मित्रांच्या मदतीमुळे पूर्ण झाली म्हणत त्याने सर्वांचे आभार मानले. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

आम्हीही भारावलो : जगदीश अग्रवाल 
सोनू बुट्टेला आमच्याकडून छोटीशी मदत मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही देखील भारावलो. कोरोना महामारीच्या या संकटातून सर्वांना सावरण्यासाठी ईश्वर बळ देवो आणि अनेकांना देखील स्वतःच्या पायावर उभे राहण्याची शक्ती मिळो, असे भावोद्गार जगदीश अग्रवाल यांनी काढले.

Edit-Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive news Disabled youth became self reliant