दहावीच्या कलागुणांना कात्री लागण्याची शक्‍यता

संदीप लांडगे  
बुधवार, 15 जानेवारी 2020

दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे कला कोट्यातील वाढीव गुण एसएससी बोर्डाकडे सादर करण्यासाठी बुधवारपर्यंत (ता.15) मुदत आहे. मात्र, या चित्रकलेचा निकालच प्रलंबित असल्यामुळे दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणांना कात्री लागण्याची शक्‍यता आहे. 

औरंगाबाद- कला संचालनालयातर्फे घेतलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यात दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे कला कोट्यातील वाढीव गुण एसएससी बोर्डाकडे सादर करण्यासाठी बुधवारपर्यंत (ता.15) मुदत आहे. मात्र, या चित्रकलेचा निकालच प्रलंबित असल्यामुळे दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणांना कात्री लागण्याची शक्‍यता आहे. 
कला संचालनालयातर्फे दरवर्षी सप्टेंबरमध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटची परीक्षा घेण्यात येते; मात्र यंदा सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यासाठी तारखा जाहीर केल्या. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकाही परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात आल्या होत्या; परंतु अचानक तांत्रिक अडचणी पुढे करीत एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर विधानसभा निवडणूक, दिवाळी यामुळे चित्रकला ग्रेड परीक्षेलाच उशीर झाला. त्यामुळे अद्याप पेपर तपासणी, गुणांचे संकलन करण्याचेच काम सुरू असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 
कला संचालनालयाकडून निकाल जाहीर केल्यानंतर तो इतर परीक्षा केंद्राकडे पाठवण्यात येतो. तेथून तो निकाल शाळांना दिला जातो आणि शाळांकडून तो निकाल बोर्डाकडे पाठविण्यात येतो. या प्रक्रियेला बराच वेळ लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत वाढीव कला गुणांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर करणे शाळांना शक्‍य नाही. 

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

अद्याप कार्यवाही नाही 
कला संचालनालयाच्या वतीने शिक्षण सचिव आणि अध्यक्षांना प्रस्ताव पाठविण्यासाठीच्या मुदतवाढीचे शिफारस पत्र पाठवण्यात आलेले आहे; परंतु अजूनही राज्य शिक्षक मंडळातर्फे काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos

मुदतवाढीची मागणी 
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होऊ देता वाढीव गुण पाठविण्याच्या प्रस्तावाला एसएससी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद विभागीय कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, संजय जाधव, राजेश निंबेकर, भागवत शिंदे, मधुकर पाटील, राजेश चौधरी, आनंद पवार, व्यंकटेश चव्हाण, पांडुरंग जाधव, चंद्रशेखर सरोदे, गणेश पवार, विवेक महाजन, विश्वनाथ ससे, श्री. सोनवणे, लक्ष्मण जांभलीकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility to scissors for Class X skills