बामुतील पदव्यूत्तरच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Aurangabad News Dr. Bamu's BOE Dr Ganesh Manza
Aurangabad News Dr. Bamu's BOE Dr Ganesh Manza

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १७ मार्चपासून सुरु होणाऱ्या पदवी अभ्यास क्रमाच्या परीक्षा तसेच ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.

परीक्षा रद्द झाल्याबद्दल समाज माध्यमात व्हायरल होत असलेले परिपत्रक खोटे आहे . त्यामुळे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राचार्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दिलेली माहितीच अधिकृत समजावी, असेही त्यांनी कळविले आहे. नवीन वेळापत्रक नंतर घोषित करण्यात येईल, असे परीक्षा विभागातर्फे जाहीर करण्यात आले.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर येत्या १४ एप्रिलपर्यंत संपुर्णतः बंद राहणार आहे. आधी २२ ते २५ मार्च, नंतर ३१ मार्चपर्यंत आणि आता १४ एप्रिलपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे. तसे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

विद्यापीठाच्या आस्थापना विभागातर्फे सोमवारी (ता. ३०) दुपारी प्रसिद्धीपत्रक काढण्‍यात आले आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन येत्या १४ एप्रिलपर्यंत विद्यापीठ परिसर पुर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. याकाळात विद्यापीठ औरंगाबाद मुख्य परिसर येथील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद उपपरिसर, समाजकार्य महाविद्यालय व मॉडेल कॉलेज, घनसावंगी हेही बंद राहील, असे कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन औषधनिर्माणशास्त्रज्ञ तथा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केले आहे. सर्वांनी घरीच बसून रहावे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने खोकल्याने, थुंकल्याने अथवा शिंकल्याने विषाणू पसरु शकतो.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com