esakal | फुलंब्री तालूक्यात गर्भवतीचा विहिरीत पडून मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

विहीर.jpg

जातेगाव येथील पुजा दुधे ही गर्भवती. शनिवारी सायंकाळी सहा वाजता शेतातील विहिरीत पडलीय ही बाब लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी तिला विहिरीच्या बाहेर काढले. फुलंब्रीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून विहिरीत पडली असल्याची माहिती सासरच्या मंडळीनी दिली आहे.

फुलंब्री तालूक्यात गर्भवतीचा विहिरीत पडून मृत्यू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री : तालुक्यातील जातेगाव येथे एका गर्भवतीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.२४ ) सायंकाळी सहा वाजता घडली. पूजा रमेश दुधे (वय २०) असे या विवाहितेचे नाव आहे.

 मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


जातेगाव येथील पुजा दुधे ही गर्भवती शनिवारी सायंकाळी सहा वाजता शेतातील विहिरीत पडलीय ही बाब लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी तिला विहिरीच्या बाहेर काढले. फुलंब्रीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून विहिरीत पडली असल्याची माहिती सासरच्या मंडळीनी दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वर्षभरापूर्वी तिचा विवाह रमेश दुधे यांच्याशी झाला होता. पुजाचे माहेर भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील असल्याची माहिती पोलिस पाटील बोबडे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गुटख्याची वाहतूक करणारे दोघे पकडले  
चित्तेपिंपळगाव : चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी गुटख्याची कारमधून अवैध वाहतूक करताना दोन जणांना शुक्रवारी (ता.२३) रात्री पकडले. 


कचनेर (ता. औरंगाबाद) शिवारात घारदोन फाटा येथे दोन जण कारमध्ये गुटख्याचे पोते घेवुन येत असल्याची माहिती शुक्रवारी रात्री पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने कचनेर शिवारातील घारदोन फाटा येथे सापळा रचला. तेव्हा बिडकीन रस्त्याने एक कार घारदोन फाट्याकडे येत असल्याचे दिसले. पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली. तेव्हा कारमधील संशयित चालक सचिन अंबादास भवर (वय २०) व अंबादास शंकर भवर (वय ४५, वर्षे दोघे रा. शेकटा ) हे दोघे दोन लाख आठ हजार रुपये किमतीचा गुटखा, तंबाखू आदी साहित्याची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांनी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे, पोलिस नाईक सोपान डकले, पोलिस कॉन्स्टेबल दीपक सुरोशे, अण्णा गावंडे यांनी केली.