esakal | राजमुद्रा टाळा, अन्यथा  शिवप्रेमींमध्ये असंतोष 
sakal

बोलून बातमी शोधा

Vinod Patil

राजमुद्रा ही एक विचार आहे, तिचे एक पावित्र्य असून तिचा कुठल्याही पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी वापर करणे म्हणजे दुर्दैवीच होईल. त्यामुळे हा प्रकार टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

राजमुद्रा टाळा, अन्यथा  शिवप्रेमींमध्ये असंतोष 

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद - राज्यात नवीन समीकरणे पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच की काय राज ठाकरे हे आपल्या पक्षाचा ध्वज बदलत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेतून साकारलेल्या राजमुद्रेचा वापर करीत आहेत. त्यांनी हा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होईल, असा इशारा आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

या अनुषंगाने श्री. ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात श्री. पाटील यांनी म्हटले, की आपल्या राजकीय वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, पक्षाचा ध्वज बदलत असताना त्यात राजमुद्रेचा वापर असल्याचे ऐकून दु:ख झाले. राजमुद्रेला एक अधिकृततेची झालर असते. ती त्या ठराविक राज्याची ओळख असते. त्यामुळे तिचा वापर करणे गैरकृत्य आहे.

हेही वाचा - कलाग्राम वर अवतरली उद्योगनगरी   

राजमुद्रा ही तमाम शिवप्रेमींचा आदर्श, प्रेरणादायी आहे. तिचा वापर कुठल्याही पक्षासाठी करणे म्हणजे स्वराज्याचा विचार मर्यादित करण्यासारखे होईल. राजमुद्रा ही एक विचार आहे, तिचे एक पावित्र्य असून तिचा कुठल्याही पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी वापर करणे म्हणजे दुर्दैवीच होईल. त्यामुळे हा प्रकार टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले तान्हाजीत बदल  

हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले