उस्मानाबाद कोरोनामुक्त : तीन रुग्णांचे अंतिम अहवाल आले निगेटिव्ह

उस्मानाबाद कोरोनामुक्त : तीन रुग्णांचे अंतिम अहवाल आले निगेटिव्ह

उमरगा : येथील कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या तिन्ही कोरोना बाधित रुग्णांचा अहवाल शुक्रवारी (ता. १७) रात्री साडे अकराच्या सुमारास प्राप्त झाल्याने  उमरगेकर आणि उस्मानाबाद जिल्हावासियांना दिलासा मिळाला होता, मात्र अंतिम अहवालाची सर्वांना प्रतीक्षा होती. सोमवारी (ता. २०) सकाळी अंतिम अहवाल प्राप्त झाले आणि तेही निगेटिव्ह. यामुळे आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला तर प्रशासन, लोकप्रतिनिधीच्या सामुहिक प्रयत्नातून जिल्हा कोरोनामूक्त झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिलासजनक ठरली.

तालुक्यातील एका गावाच्या एका पॉझिटिव्ह रुग्णावर एक एप्रिलपासून येथील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते त्यानंतर दाखल झालेल्या तर शहरातील एक व लोहारा तालुक्यातील एक रुग्णावर उपचार सुरू होते. नियमित औषधोपचारामुळे त्यांची प्रकृतीही स्थिर होती. उपचाराचा चौदा दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्याने गुरूवारी (ता. १६) त्या तिघांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले होते. शुक्रवारी (ता. १७) रात्री त्यांचा अहवाल प्राप्त झाला आणि तो निगेटिव्ह आल्याने उमरगेकरांना दिलासा मिळाला होता ; तरीही संशयाचे ढग आणखी दूर होण्यासाठी नियमानुसार दुसरी चाचणी करण्यासाठी शनिवारी (ता. १८) स्वॅब पाठविण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत अहवाल प्राप्त झाला नव्हता. सोमवारी सकाळी अहवाल प्राप्त झाला आणि आरोग्य विभागाने मोठ्या जोखीमेतून केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले. रुग्णांनीही उपचाराला प्रतिसाद देत डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.

आरोग्य विभागाच्या प्रयत्नाला मिळाले यश 

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने येथील प्रशासनाने नियोजन केले होते. विदेश, आंतरराज्यासह मुंबई, पूणे आदी भागातून आलेल्या लोकांची तपासणी केली गेली. एक  ते तीन एप्रिल दरम्यान उमरगा तालुक्यातील दोन तर मुंबईहुन अहवाल आलेल्या लोहारा तालुक्यातील एक अशा तिघा बाधितावर उपचार सुरू केले.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क मधील ४१ लोकांची दुबार चाचणी केली, त्यात सर्वांची अहवाल निगेटिव्ह आले. त्यात शहरातील १८ तर एका गावातील २३ जणांचा समावेश होता. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय अधिक्षक डॉ. पंडीत पूरी, डॉ. वसंत बाबरे, डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. प्रविण जगताप, डॉ. बसवराज दानाई, डॉ. विनोद जाधव, डॉ. कुलकर्णी, डॉ. यशवंत पाटील यांच्यासह सर्व डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी  जोखीमेतून वैद्यकिय सेवा केली. दरम्यान उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले, सिद्धेश्वर गोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळूंके, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम आदींनी कोरोनामूक्तीच्या लढ्यात सहभाग घेऊन जनजागृती केली.

रेशनिंग आणायला जाता ? मग आधी हे वाचा...

मेहुणीच्या गर्भातलं बाळ विकण्यासाठी फेसबुकवरून केला सौदा

तीन बाधित रुग्णांचा अंतिम अहवाल निगेटिव्ह आल्याने रुग्णासह त्यांचे नातेवाईक आणि तमाम नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  लोकप्रतिनिधी, महसूल, पोलिस यंत्रणा, आरोग्य व पालिका विभागाने मोलाचे सहकार्य केले. अहवाल निगेटिव्ह आले म्हणून कुणीही गाफील राहू नये. नेहमीप्रमाणे घरात थांबणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे महत्वाचे आहे. सुट्टी दिलेल्या रुग्णांनी चौदा दिवस घरात कटाक्षाने रहाणे गरजेचे असून त्यांच्या आरोग्याविषयीची विचारपूस केली जाणार आहे. 
-  डॉ.पंडीत पुरी, वैद्यकिय अधिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com