हो! आता मोबाईलमधून आपोआप होणार सगळेच चायनीज ॲप्स डिलीट

Remove China Apps
Remove China Apps

औरंगाबाद: लॉकडाऊन आणि चायनीज उत्पादने यांचा संबंध लावला तर टिकटॅक मोबाईल ॲप्स ते इतर चायनीज वस्तूंवर बॅन आणण्याच्या हालचाली आणि त्यासंदर्भातील सोशल मीडियावरील चर्चेला ऊत आलेला दिसतो. इंटरनेटचा वापर करून लॉकडाउनच्या काळात जे बदल होत आहेत ते आता ऐतिहासिकच ठरतील अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगत आहे. याचाच एक भाग म्हणजे रिमोव्ह चायनिच ॲप्स हा होय.

आपल्या मोबाईलमधील सर्व चायनीज ॲप्सला क्षणात उडवून टाकणारे वन टच या भारतीय ॲप्स डेव्हलोपर्सने तयार केलेले हे ॲप्स अवघ्या तेरा दिवसांच तब्बल १० लाखांहून अधिक युजर्सने डाऊनलोड केले आहे.लॉकडाऊनच्या काळात चायनीज ॲप्ससोबतच इतरही चायनीज उत्पादने न वापरण्याकडे जास्तीत जास्त कल आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास काही सेलिब्रिटींनीही टिकटॉकसारखे ॲप्स अनइन्स्टॉल केल्याचे मागच्या आठवड्यात समोर आले होते.

‘आत्मनिर्भर बनो’ला असाही प्रतिसाद
१४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर बनो’ चे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत रिमोव्ह चायनीज ॲप्सची वन टच या भारतीय ॲप्स डेव्हलोपर्स निर्मिती केली असून तसा संदर्भही वन टचतर्फे देण्यात आला आहे. प्रामुख्याने १४ मे रोजीचे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले आणि अवघ्या तीनच दिवसात म्हणजे १७ मे या ॲप्सचे लॉन्चिंग करण्यात आले आहे.

वन टच या डेव्हलोपर्सने ‘रिमोव्ह चायना ॲप्स’ हे पहिल्या टप्प्यात शैक्षणिक उद्देशासाठी बनविले होते. मात्र त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यातील अद्ययावतीकरणाकडे पाऊल टाकले आहे. #BoycottMadeINChina या हॅशटॅगखाली ट्विटरवर राबविण्यात आलेल्या मोहिमेत जवळपास ५८००० हून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.

ॲप्स असे करते कार्य

रिमोव्ह चायनिज ॲप्स हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईलमधील जवळपास सर्वच चायनिज बनावटीची मोबाईल ॲप्स सर्च करते, आणि त्यानंतर अशी चायनीज ॲप्स एकेक डिलीट (अनइन्स्टॉल) होतात. मात्र रुट नसलेले किंवा मोबाईलमध्ये बायडिफॉल्ट असलेले चायनिज ॲप्स डिलीट होत नाहीत. या संकल्पनेला तांत्रिक भाषेत ब्लोटवेअर अर्थात प्रिइन्स्टॉल्ड ॲप्स असेही म्हणतात. वेब डेव्हलोपर्स प्रदीप तांबे यांच्या मते या ॲप्सची निर्मिती आणि त्यातील अद्ययावतीकरण पाहता भविष्यात असेही ॲप्स अनइन्स्टॉल होतील.

मुळात कोणत्याही ॲप्सद्वारे गुगलला महसूलच मिळत असतो, मात्र वन टचने निर्मिती केलेल्या रिमोव्ह चायना ॲप्सद्वारे एका ठराविक देशाला टारगेट केले आहे असे दिसते. त्यामुळे भविष्यात वन टचच्या या संबंधित ॲप्सवर गुगलकडून बॅनही आणले जाऊ शकते. कोरोना व्हायरस आणि त्यांबदद्लच्या वादाच्या अनुषंगाने भारतीयांकडून या ॲप्सकडे एक इनीशिएटीव्ह म्हणून बघायला हवे.
-प्रदीप तांबे, ॲप्स् डेव्हलोपर्स.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com