औरंगाबाद बघा कसा ठोकतोय रिक्षावाला

Lahu Chavhan, Sespected
Lahu Chavhan, Sespected

औरंगाबाद - परभणी येथून रेल्वेने औरंगाबाद पोहोचल्यानंतर घरी पायी जाताना प्रवाशाच्या अंगावर रिक्षा घालून त्याचे मोबाईल व पैसे लुबाडणाऱ्या रिक्षाचालकाला पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.  तो अट्टल असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. २८) करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गिरीश व्यंकटराव गोरेगावकर (वय ४५ वर्ष रा. नेहा कॅसल, फ्लॅट नंबर ० ५) विद्यानगर, औरंगाबाद) हे परभणी येथून रेल्वेने औरंगाबादला गुरुवारी (ता. २७) रात्री बारा वाजता आले होते. रेल्वे स्थानकातुन रिक्षाने ते सेव्हन हिल येथे आले व पायी चालत विद्यानगर येथील घराकडे जात होते. त्यावेळी अरिहंत होंडा शोरूम जवळ गजानन महाराज मंदिर रोडवर एक रिक्षा उभी होती.

रिक्षाचालकाने गोळेगावकर यांना कोठे जायचे आहे? असे विचारत रिक्षात बसा म्हणाला. मात्र गोळेगावकर यांनी घर जवळच आहे त्यामुळे पायी जाणार असल्याचे रिक्षाचालकाला सांगितले. यानंतर गोळेगावकर पायी पुढे निघाले. त्यावेळी चालकाने रिक्षा सुरू करून मागून येत गोळेगावकर यांच्या अंगावर घालून कट मारला त्यामुळे गोळेगावकर घाबरून वाचवा वाचवा असे म्हणत रस्त्याने पळत सुटले.

यानंतर रिक्षातील एकाने त्यांचा पळत पाठलाग केला तर चालकाने रिक्षाने गोळेगावकर यांना गाठले. या गडबडीत गोळेगावकर खाली पडले. चालक आणि रिक्षातील दुसऱ्या सहकाऱ्याने गोळेगावकर यांचा मोबाईल उचलून दोघे रिक्षाने पसार झाले. 

या घटनेनंतर गोळेगावकर यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाणे गाठले आणि रीतसर तक्रार दिली. या प्रकरणात जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासणी केली त्यावेळी सीसीटीव्हीमध्ये रिक्षाचा नंबर व संशयिताचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. 

पोलिसांनी रेकॉर्डवरील संशयिताची माहिती घेतली. त्यानंतर एका खबऱ्याच्या माहितीवरुन संशयित लहू उर्फ धरल्या रमेश चव्हाण (वय २५, रा. रेल्वे गेट नंबर ५६ जवळ मुकुंदनगर, मुकुंदवाडी) याला व त्याच्यासोबतचा अल्पवयीन असलेल्या नातेवाईकाला चोवीस तासात पोलिसांनी अटक केली.

गुन्ह्यात वापरलेली एलपीजी ऑटो रिक्षा व मोबाईलही जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक निरिक्षक घनशाम सोनवणे, उपनिरिक्षक प्रभाकर सोनवणे रमेश सांगळे बाळाराम थोरे प्रवीण मुळे विलास डोईफोडे शिवाजी गायकवाड दीपक जाधव जालिंदर मांटे रवी जाधव निखिल खराडकर यांनी केली 

त्यांनी गळाही चाचपला होता 
लहू उर्फ झगल्याने गोळेगावकर यांच्या गळ्यात सोन्याची साखळी असेल म्हणुन त्यांनी चाचपणी केली; परंतु गळ्यात साखळी सापडली नाही मग त्यांनी खिशातील सतराशे रुपये व मोबाईल हिसकावुन नेला होता. दिड महिण्यापुर्वीच झगल्याने रिक्षा घेतला होता. 

पोलिसांच्या रेकॉर्डवरील

लहू उर्फ झगल्या चव्हाण पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. त्याच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात चार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात एक क्रांती चौक पोलिस ठाण्यात एक असे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याने अशाच प्रकारे प्रवाशांना रिक्षात बसून जबरी चोरी केल्याच्या शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com