esakal | 'सचखंड'च्या प्रवाशांची उद्यापासून चाचणी, महापालिकेचे रेल्वेस्टेशनवर दोन पथके!
sakal

बोलून बातमी शोधा

railway statiopn.jpg

दिल्लीत कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे दिल्लीहून शहरात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. रविवारपासून (ता.२२) सचखंड एक्स्प्रेसने स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाणार असून, त्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

'सचखंड'च्या प्रवाशांची उद्यापासून चाचणी, महापालिकेचे रेल्वेस्टेशनवर दोन पथके!

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : दिल्लीत कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे दिल्लीहून शहरात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. रविवारपासून (ता.२२) सचखंड एक्स्प्रेसने स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाणार असून, त्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यात कोरोना संसर्गाने दिल्ली कहर सुरू केला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने देशभर चिंता व्यक्त केली जात आहे. दिल्लीतून येणारी सचखंड एक्स्प्रेस ही रेल्वे औरंगाबादहून नांदडला जाते. त्यामुळे महापालिकेने देखील खबरदारी म्हणून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याविषयी श्रीमती पाडळकर यांनी सांगितले की, सचखंड एक्स्प्रेसने शहरात रोज सरासरी दोनशे ते अडीचशे प्रवासी येतात. या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. रविवारपासून ही तपासणी सुरू होईल. त्यासाठी दोन पथके रेल्वेस्टेशनवर पाठविली जातील. रेल्वेतून उतरणाऱ्या प्रत्येकाची चाचणी होईल, याची खबरदारी घेतली जाणार आहे. रेल्वे प्रशासन महापालिकेला मदत करणार आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)