esakal | तयारी शाळेची : औरंगाबादेत साडेतीन हजार शिक्षकांची होणार कोरोना चाचणी!
sakal

बोलून बातमी शोधा

corona test enbeded.jpg

तयारी शाळांची : १६ केंद्रावर महापालिकेची सुविधा 

तयारी शाळेची : औरंगाबादेत साडेतीन हजार शिक्षकांची होणार कोरोना चाचणी!

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नववी  ते बारावी पर्यंतचे वर्ग सोमवारपासून (ता. २३) सुरू केले जाणार आहेत. मात्र शाळेत जाण्यापूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात सुमारे साडेतीन हजार चाचण्या केल्या जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी बुधवारी (ता. १८) सांगितले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोना संसर्गामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. दरम्यान कोरोना संसर्ग कमी होताच राज्य शासनाने मिशन बिगेन-अगेन अंतर्गत लॉकडाऊनमधून सूट देत टप्प्या-टप्‍याने बाजारपेठा खुल्या केल्या. नुकतेच मंदिरेही सुरू करण्यात आली आहेत. तसेच ८ वी ते १० व ११, १२ वीचे वर्ग सोमवारपासून (ता. २३) सुरू केले जाणार आहेत. शाळेत जाण्यापूर्वी खबरदारी म्हणून शिक्षकांना कोरोना चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्वच १६ कोरोना चाचणी केंद्रावर अतिरिक्त चाचणी कीट पाठविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारपासून (ता.१७) केंद्रावरील कर्मचाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्याचे श्रीमती पाडळकर यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रत्येकाला देणार प्रमाणपत्र 
शिक्षक, शिक्षकेतर असे सुमारे साडेतीन हजार जणांच्या चाचण्या करणे गरजेचे असल्याचे शिक्षण विभागाने महापालिकेला कळविले आहे. आरटीपीसीआर पद्धतीच्या या चाचण्या केल्या जाणार असून, सोमवारपर्यंत चाचण्या पूर्ण केल्या जातील. प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे श्रीमती पाडळकर यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या ठिकाणी आहे सुविधा 
एमआयटी हॉस्टेल, बीड बायपास, अग्निशमन केंद्राची इमारत पदमपूरा, समाजकल्याण हॉस्टेल किलेअर्क, एमजीएम स्पोर्ट कॉम्पलेक्स, सिपेट चिकलठाणा (२४ तास सेवा). तसेच बायजीपूरा आरोग्य केंद्र, तापडिया मैदान, अदालत रोड, रिलायन्स मॉल गारखेडा, महापालिका आरोग्य केंद्र एन- ११, आरोग्य केंद्र राजनगर, सिडको एन- २ कम्युनिटी सेंटर, हर्षनगर, चिकलठाणा, सिडको एन-८ आणि शिवाजीनगर आरोग्य केंद्र व छावणी परिषद रुग्णालयात सकाळी ११ ते सांयकाळी सहा यावेळेत कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. 

(Edited By Pratap Awachar)