Coronavirus : औरंगाबादेत २१ वा बळी, दिवसभरात ६२ रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

दिवसभरात ६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, बाधित रुग्णांची संख्या ७५० झाली आहे. जिल्हा प्रशासन व घाटी रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आली. 

औरंगाबाद : शहरात गत दोन दिवसांत चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असतानाच आज (ता. १४) पहाटे साडेपाचच्या सुमारास हुसेन कॉलनीतील ५५ वर्षीय महिलेचा तर सायंकाळी ७५ वर्षीय पुरुषाचा कोरोना व इतर आजाराने मृत्यू झाला. आता शहरातील मृतांचा आकडा चिंताजनक असून, तो २१ वर पोचला आहे. दिवसभरात ६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, बाधित रुग्णांची संख्या ७५० झाली आहे. जिल्हा प्रशासन व घाटी रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आली. 

५५ वर्षीय मृत महिला गारखेडा, हुसेन कॉलनी येथे राहत होती. बारा मे रोजी एका खासगी रुग्णालयातून तिला घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. त्यांना पूर्वीपासून मधुमेह, उच्चरक्तदाब व हायपोथायरॉडिझमचा त्रास होता. तिचा १२ मे रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज पहाटे तिचा मृत्यू झाला. जुना बाजार येथील एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला नऊ मे रोजी घाटी रुग्णालयात संदर्भित केले होते. त्यांच्या कोविड-१९ च्या चाचणीचा अहवाल ९ मे रोजी पॉझि़टिव्ह आला होता. त्यांच्या दोन्ही फुफ्फसांमध्ये तीव्र न्युमोनियाचा संसर्ग झालेला होता. त्यामुळे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज (ता. १४) सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 
 - 
या भागांत आढळले रुग्ण 
भीमनगर भावसिंगपुरा- १५, शिवपुरी पडेगाव- १, उस्मानपुरा- ७, सिल्कमिल कॉलनी- १, कांचनवाडी- १, नारळीबाग- १, आरटीओ कार्यालय- २, गरमपाणी- १, बन्सीलालनगर- १, सातारा परिसर- २, आलोकनगर, सातारा परिसर- १, सातारा ग्रामपंचायत- ५,  सातारा खंडोबा मंदिरजवळ- १, संजयनगर, मुकुंदवाडी- ४, हुसेन कॉलनी- २, दत्तनगर गल्ली न. ५- १, न्यायनगर- २, पुंडलिकनगर- २  गुरुनगर- १, न्यू नंदनवन कॉलनी- १, गारखेडा- १, शहानूरवाडी- १, बेगमपुरा- १, बजाजनगर (वाळूज)- १, किराडपुरा- १, बारी कॉलनी, रोशनगेट- १, आसेफिया कॉलनी- १, कटकटगेट- १, इंदिरानगर, बायजीपुरा- १, इतर- १. एकूण- ६२. 

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली  
  
१८ महिन्यांच्या बाळाला कोरोना 
शहरातील उस्मानपुरा भागातील अठरा महिन्यांच्या बाळाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसभरात एकूण १० मुले बाधित आढळली. यात सहा मुली व चार मुले असून अठरा महिने ते सोळा वर्षे असे त्यांचे वय आहे. एकूण ६२ बाधितांमध्ये २८ महिला व ३४ पुरुष आहेत. 
 
कोरोना मीटर 

  • उपचार घेणारे रुग्ण ः ५१९ 
  • बरे झालेले रुग्ण ः २१० 
  • एकूण मृत्यू ः २१ 

 
एकूण रुग्णसंख्या ः ७५० 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior citizen's death due to COVID-19