मुंबई बाजार समिती निवडणुकीत मराठवाड्याचे सात उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी (ता. 14) शेवटची तारीख होती. शनिवारी (ता. 15) चिन्हांचे वाटप होणार आहे. 

औरंगाबाद, ता. 14 : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मराठवाड्यातील दोन जागांसाठी सात उमेदवार मैदानात आहेत. भाजपकडून दोन तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनकडून प्रत्येकी एका उमेदवाराने बंडखोरी केली आहे.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी (ता. 14) शेवटची तारीख होती. शनिवारी (ता. 15) चिन्हांचे वाटप होणार आहे. 

हेही वाचा  राज ठाकरे अडकले, आणि मग...   

या बाजार समितीच्या 25 जागांसाठी 29 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या बाजार समितीवरील राज्यातील प्रत्येक विभागातून दोन संचालकाची निवड करण्यात येते. पंधरा वर्षांपासून या बाजार समितीची निवडणूक झाली नव्हती. यामुळे पंधरा वर्षांपासून ही बाजार समिती प्रशासकाच्या माध्यमातून चालविण्यात आली. यात मराठवाड्यातून विविध बाजार समितीतून दोन संचालकांची निवड केली जाते. 

हेही वाचा सेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे यांनी काय केले  

निवडणुकीत रंगत
मराठवाड्यातून भाजपतर्फे औरंगाबादेतून राधाकिसन पठाडे, चाकूर बाजार समितीचे प्रशांत पाटील, कॉंग्रेसकडून वैजीनाथराव शिंदे, राष्ट्रवादीकडून माजलगावचे अशोक डक, कॉंग्रेसकडून अशोक शिवाजीराव निलंगेकर यांनी बंडखोरी केली. हिंगोलीचे राजेश पाटील, शिवसेनेचे चंद्रकांत जाधव यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे या निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे. तीन मार्चला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 

हेही वाचा- सयाजी शिंदे म्हणाले, मी वड बोलतोय... माझा जन्म १८५७ चा 

957 मतदार निवडणार दोन संचालक 
मराठवाड्यातून मुंबई बाजार समितीवर दोन संचालक निवडून जाणार आहेत. यासाठी मराठवाड्यातून सात उमेदवार रिंगणात आहे. यात कॉंग्रेस, व शिवसेनकडून बंडखोरी करण्यात आली आहे. या सात उमेदवारांतून 957 मतदार संचालकांची निवड करणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven Candidates of Marathwada in Mumbai Market Committee Elections