esakal | Breaking:औरंगाबादेत कोरोनाचा ७० वा बळी, आज ४२ रुग्ण वाढले, एकूण @१५४० पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

औरंगाबाद शहरात कोरोनाचा आणखी एक बळी गेला असून मृत्युसंख्या सत्तर एवढी झाली. आज (ता.३१) सकाळी ४२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५४० झाली. यापैकी ९७६ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आता ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Breaking:औरंगाबादेत कोरोनाचा ७० वा बळी, आज ४२ रुग्ण वाढले, एकूण @१५४० पॉझिटिव्ह

sakal_logo
By
मनोज साखरे

औंरगाबाद : शहरात कोरोनाचा आणखी एक बळी गेला असून मृत्युसंख्या सत्तर एवढी झाली. आज (ता.३१) सकाळी ४२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५४० झाली. यापैकी ९७६ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आता ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

क्लिक करा: सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

७० वा मृत्यू
औरंगाबाद शहरातील निझामगंज कॉलनी येथील ५२ वर्षीय महिला रुग्णाचा ३० मे रोजी सायं.५.२० वाजता उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)  मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत ५९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर  खासगी रुग्णालयात १०, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण ७० कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज आढळलेले ४२ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)
भवानीनगर, जुना मोंढा (४), कैलास नगर, गल्ली क्रमांक  दोन (३), एन सहा, सिडको (३), जाफर गेट, जुना मोंढा (१),  गल्ली क्रमांक १७, संजय नगर, मुकुंदवाडी (१), गल्ली क्रमांक चार रहीम नगर, जसवंतपुरा (१), व्यंकटेश नगर, जालना रोड (१), समता नगर (१),  नवीन बायजीपुरा (१), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (१),किराडपुरा (३), पिसादेवी रोड (१), बजाज नगर (१), देवळाई परिसर (१),  नाथ नगर (१), बालाजी नगर (१), हमालवाडी (१),  जुना बाजार (२), भोईवाडा (१), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (२), सुराणा नगर (१),  आझम कॉलनी (१), सादात नगर (१), महेमुदपुरा, हडको (१), निझामगंज कॉलनी (१), शहागंज (१), गल्ली क्रमांक २४ संजय नगर (१), बीड बायपास रोड (१), स्वप्न नगरी (१), अन्य (२) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये  २४ महिला आणि १८ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

असा आहे कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण               - ९७६
एकूण मृत्यू                   -   ७०
उपचार सुरु असलेले रुग्ण   -  ४९४
एकूण रुग्णसंख्या             - १५४०

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग