नवे तंत्रज्ञान संशोधनासाठी शाहु तंत्रनिकेतनचा मसिआ सोबत करार

अतुल पाटील
बुधवार, 25 डिसेंबर 2019

औरंगाबाद : कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ) सोबत सामंजस्य करार झाला आहे. करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

औरंगाबाद : कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ) सोबत सामंजस्य करार झाला आहे. करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे हब ऍण्ड स्पोक मॉडेल अंतर्गत शाहु तंत्रनिकेतनची हब इन्स्टिट्युट म्हणून निवड झाली आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगांशी जोडून त्यांची कौशल्य विकसित करण्यासाठी हा करार महत्वाचा असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश डोंगरे यांनी केले. मसिआचे सचिव अर्जुन गायकवाड आणि प्राचार्य डोंगरे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

करारामध्ये संस्थेला तांत्रिक सहकार्य मिळवणे, उद्योगांना भेटी देऊन प्रात्यक्षिक ज्ञान अद्ययावत करणे, सहा आठवड्यांचे इनप्लान्ट ट्रेनिंग, यातून इंडस्ट्री कल्चर आणि शिस्त विकसीत करणे, उद्योगातील प्रक्रिया, उपक्रमांची माहिती देणे, परिसर मुलाखतीत रोजगार निर्माण करणे, उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करणे, तज्ज्ञांची मार्गदर्शन शिबीर घेणे, सामाजिकदृष्ट्या फायदेशीर गुणवत्तापुर्ण अभियंता निर्माण करणे, इंडस्ट्री-इंन्स्टिट्युट इंटरऍक्‍शन सेलच्या माध्यमातून तांत्रिक बाबींचे सहकार्य मिळवणे, साध्य होणार आहे.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

मसिआसोबत झालेल्या करारावेळी उपाध्यक्ष अभय हंचनाळ, सचिन अर्जुन गायकवाड, तंत्रशिक्षणचे सहाय्यक सचिव देवेंद्र दंडगव्हाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश डोंगरे, संस्थेचे एचआर अशोक आहेर, एमजीएमचे प्राचार्य बी. एम. पाटील, आयईटीचे प्राचार्य अभय वावरे, श्रीयशच्या प्राचार्या सीमा शेंडे, साईचे श्री. शकील, एमआयटीचे आर. व्ही. देशमुख, एसबीएनएमचे डी. ए. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahu Polytechnic agreement with Massia for new technology research