शेख इरफान ठरला मराठवाड्याचा युवावक्ता

Aurangabad News Shaikh Irfan Marathwadyacha YuvaVakta
Aurangabad News Shaikh Irfan Marathwadyacha YuvaVakta

औरंगाबाद : आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतील महाअंतिम फेरीत औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख इरफान याने प्रथम क्रमांक पटकावत मराठवाड्याचा युवावक्ता होण्याचा बहूमान मिळवला. तर कृष्णा तिडके, दीक्षा सावंत यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटाकवले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सतीश चव्हाण यांनी मराठवाड्याचा युवावक्‍ता या वक्‍तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांच्याहस्ते झाले. कृष्णा तिडके हा नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून दीक्षा सावंत ही बीड येथील बलभीम महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. विजेत्यांना अनुक्रमे 21 हजार, 15 हजार आणि 11 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

आयोजक सतीश चव्हाण, परिक्षक डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. निर्मला जाधव, केशव खटींग यांची उपस्थिती होती. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील विजेत्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी शुक्रवारी (ता. 25) देवगिरी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. महाअंतिम फेरीसाठी खासदार शरद पवार : असामान्य कर्तृत्वाची लोकगाथा..!, अस्मानी, सुलतानीला भेदू कसे?, मेक इन इंडिया: व्हाया मंदिर ते मंदी, ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही हे विषय होते.

पारितोषिक वितरणप्रसंगी श्री. मिटकरी म्हणाले, स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर बहुभाषिक असले पहिजे. वक्तृत्वाचा उद्देश समाजातील विषमता दूर करण्यासाठी असावा. वक्‍त्यांमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे आणि तो आत्मविश्वास वाचनाने येतो. आमदार चव्हाण यांनी युवकांना या स्पर्धेच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून अशा स्पर्धेमधून भविष्यात देशाला राजकीय नेतृत्व मिळण्यास नक्कीच मदत होईल, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com