शेंद्रा, बिडकीन डीएमआयसीत होणार नवे पोलीस ठाणे 

सुषेन जाधव
Tuesday, 3 November 2020

महासंचालकांकडे प्रस्ताव सादर : औद्यागिक विकास महामंडळाने दिली मान्यता 

औरंगाबाद :  जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत येणाऱ्या ऑरिक सिटी आणि शेंद्रा, बिडकिन परिसरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प उभारण्यात येत आहे. या औद्योगिक वसाहतीत दोन पोलीस ठाणे आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत, त्यासाठी औद्यागिक विकास महामंडळाने दिलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून पोलीस महासंचालकांकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

केंद्र सरकारच्या महत्त्वांकाक्षी डीएमआयसी योजनेचा मोठा टप्पा औरंगाबाद परिसरात साकारत आहे. वर्षभरापूर्वी शेंद्रा परिसरात ऑरिक सिटीच्या पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात झाली. केंद्र सरकारकडून या भागातील पायाभूत सुविधांसाठी ६ हजार ३३० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

डीएमआयसीडीसीच्या आराखड्यानुसार बिडकीन परिसरात तीन टप्प्यांमध्ये विकासकामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, पूल, जलवाहिनी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पावसाचे पाणी साठविणारी यंत्रणा, भूमिगत जलवाहिनी, भूमिगत विद्युतवाहिनी, वीजवितरणाचे आठ सबस्टेशन कामांना सुरवात झालेली आहे. एक हजार हेक्टरच्या पहिल्या टप्प्यात या पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. शेंद्रा परिसरातील पायाभूत सुविधांचे काम पुढच्या टप्प्यात पोचले आहे. बिडकीन परिसरातील कामांना वेग घेतला आहे. केंद्राचा हा महत्त्वांकाक्षी प्रकल्प पूर्ण रुपात साकारण्यापूर्वी या औद्योगिक परिसरात दोन स्वतंत्र पोलीस ठाणे आणि पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी भव्य निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी जागादेखील निश्चीत करण्यात आली असून या बाबत औद्योगिक विकास मंडळाने प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविला होता. तो विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने हा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला आहे. त्यानुसार चिकलठाणा आणि बिडकीन येथील दोन्ही पोलीस ठाणे हे औद्योगिक वसाहतीत जाणार आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

स्वतंत्र डीवायएसपींची नेमणूक 
शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयडीसी परिसरात ठाणे हस्तांतरीत झाल्यानंतर या दोन्ही पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वाढविण्यात येणार आहे. याशिवाय उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाचा एक स्वतंत्र अधिकारी आणि इतर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. करमाड पोलीस ठाणे हद्दीत मोठा बदल केला जाणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले. 
 
मनुष्यबळाची अशी असेल रचना 

 

  • पोलीस ठाणे शेंद्रा : पद संख्या 
  • पोलीस निरीक्षक : १ 
  • सहायक पोलिस निरीक्षक : २ 
  • पोलिस उपनिरीक्षक : ४ 
  • अंमलदार : ४० 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बिडकीन ठाणे : पद संख्या 

 

  • पोलीस निरीक्षक ः १ 
  • सहायक पोलिस निरीक्षक ः १ 
  • पोलिस उपनिरीक्षक ः ३ 
  • अंमलदार ः ३५ 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shendra Bidkin DMIC to be new police station