अखेर शिर्डी संस्थानला मिळाली परवानगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

श्री साईबाबा शिर्डी संस्थानतर्फे वर्ष 2020-21 या वर्षासाठीच्या 42 कोटी रुपयांच्या धान्य खरेदी, भुसारा किराणा माल खरेदीसाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करणाऱ्या दिवाणी अर्जाच्या सुनावणीअंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली

औरंगाबाद : श्री साईबाबा शिर्डी संस्थानतर्फे वर्ष 2020-21 या वर्षासाठीच्या 42 कोटी रुपयांच्या धान्य खरेदी, भुसारा किराणा माल खरेदीसाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करणाऱ्या दिवाणी अर्जाच्या सुनावणीअंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली; तसेच संस्थानतर्फे चालविणाऱ्या जाणाऱ्या रुग्णालयात गरीब रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या खर्चासाठीही खंडपीठाने मान्यता दिली.

राज ठाकरे असे अडकले - वाचा 

या प्रकरणात संस्थानचे माजी विश्‍वस्त उत्तम शेळके यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार खंडपीठाने यापूर्वीच तदर्थ समितीत स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीला धोरणात्मक व आर्थिक निर्णय घ्यावयाचे असतील तर खंडपीठाची परवानगी घ्यावी लागेल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले होते.

कॅन्सर वार्ड सुरू करावा

त्यानुसार संस्थानतर्फे खंडपीठात विनंती करण्यात आली की, संस्थानतर्फे साईबाबा रुग्णालय व साईनाथ रुग्णालय ही दोन रुग्णालये चालविली जातात. संस्थानच्या या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना जी सवलत दिली जाते, त्यासाठीच्या खर्चासाठी मान्यता मिळावी ही विनंती खंडपीठाने मान्य केली. तसेच संस्थानतर्फे कॅन्सर वार्ड सुरू करावा अशी तोंडी सूचनाही खंडपीठाने दिली. 

आदित्य ठाकरे यांचं औरंगाबादेत मोठं वक्तव्य

खंडपीठाने 2020-2021 या वर्षाच्या 42 कोटी रुपयांच्या धान्य, किराणा व भुसार माल खरेदीसाठी ईनिविदा पद्धतीने खरेदी करण्यात यावी असे निर्देश दिले. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यातर्फे म्हणणे मांडण्यात आले की, गहू, बाजरी, ज्वारी, साखर, तांदूळ आदी धान्य संस्थानने अन्नधान्य महामंडळाकडून खरेदी करावे. या बाबींचा संस्थानने विचार करावा अशी सूचना खंडपीठाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirdi Saibaba Trust Allowed To Purchase Wheat Aurangabad Shirdi High Court News