तलावाच्या जलपूजनातही शिवसेनेची गटबाजी चव्हाट्यावर

मधुकर कांबळे  
Monday, 3 August 2020

जलपूजनाच्या निमित्ताने शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उघड झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांची मात्र पंचाईत झाली. काहींनी कोणाचीही नाराजी नको म्हणत दोन्ही नेत्यांच्या जलपूजनाला हजेरी लावली. 

औरंगाबाद : स्थानिक शिवसेनेत दोन गट आता उघडपणे आपले स्वतंत्र कार्यक्रम करताना दिसत आहेत. तुडूंब भरलेल्या ऐतिहासिक हर्सुल तलावाचे जलपूजन करण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे वेगवेगळे गेले. यामुळे यानिमित्ताने गटबाजी पुन्हा उघड झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांची मात्र पंचाईत झाली. काहींनी कोणाचीही नाराजी नको म्हणत दोन्ही नेत्यांच्या जलपूजनाला हजेरी लावली. 

यंदा पाऊस चांगला झाल्याने हर्सुल तलाव तुडूंब भरला आहे. शहराच्या १३ वॉर्डाला या तलावातून पाणीपुरवठा केला जातो. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शिवसेनेच्यावतीने हर्सूल तलावाचे ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत विधिवत पूजन केले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख नारायण सुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, महिला आघाडी उपजिल्हासंघटक प्रतिभा जगताप, नगरसेवक बन्सी जाधव, किशोर नागरे, रुपचंद वाघमारे, माजी नगरसेवक रविकांत गवळी, उपशहरप्रमुख संजय हरणे, काशिनाथ बकले, गणेश सुरे, मच्छीन्द्र हरणे, रमेश सूर्यवंशी, युवासेना उपशहरप्रमुख नागेश थोरात, रविराज क्षीरसागर, चंद्रकांत सुरे, अक्षय पाथरीकर, भारत पचलोरे, कार्तिक सुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते जलपूजन

 ऐतिहासिक वारसा लाभलेल्या हर्सुल तलावाचे जलपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या शुभहस्ते जलपूजन करण्यात आले. ब्रम्हवृंदांच्या साक्षीने वेदपठण मंत्रोच्चाराच्या जयघोषात विधिवत जलदेवतेचे पूजन करून सतत अशीच कृपा सतत आम्हा पामरांवर राहू दे सुख समृद्धी मन शांती लाभू दे असे आवाहन जलदेवतेला करण्यात आले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

याप्रसंगी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात , उपशहरप्रमुख संजय हरणे , रमेश ईधाटे , विभागप्रमुख सुरेश फसाटे , नगरसेवक रूपचंद वाघमारे ,बन्सी मामा, उपजिल्हासंघटक प्रतिभा जगताप , उपशहरसंघटक मिना फसाटे , रंगनाथ राठोड, कृष्णा बोरसे , नागेश थोरात , शिवाजी शिरसाठ , सुनील वाकडे , अक्षय दांडगे. तुळशीराम बकले आदींची उपस्थिती होती. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Senas Factionalism In Jalpujan Of Hersul Lake Aurangabad News