शिवसेनेच्या राज्यात रामाची पूजा करू देत नाहीत : आ. अतुल सावे

प्रकाश बनकर
Wednesday, 5 August 2020

अतुल सावे यांचा आरोप; शहरात ठिकठिकाणी केली आरती 

औरंगाबाद : हे शिवसेनेचे राज्य आहे असे म्हणतात. मात्र, या राज्यात रामाची पूजा करू देत नाहीत, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असा आरोप आमदार अतुल सावे यांनी बुधवारी (ता. पाच) केला. अयोध्येत आज राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यानिमित्ताने शहरात भाजपतर्फे ठिकठिकाणी श्रीरामचंद्रांचे जल्लोषात पूजन व आरती करण्यात आली. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

सकाळी अकरादरम्यान गजानन महाराज मंदिर परिसरात आरती करण्यासाठी आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, कचरू घोडके, प्रमोद राठोड, समीर राजूरकर, महिला मोर्चाच्या मनीषा मुंडे यांच्यासह पदाधिकारी एकत्र आले होते. पोलिसांतर्फे मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. तसेच पाचपेक्षा जास्त लोक एकत्र न येण्याचे आवाहनही पोलिसांनी केले होते. भाजपच्या आरतीच्या ठिकाणी जास्त लोक आल्याने पोलिसांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती होती. पोलिस आयुक्तांसह गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी आमदार सावे व केणेकर यांची भेट घेतली व समजूत काढली. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश
यावेळी अतुल सावे म्हणाले, की शिवसेनेचे राज्य असल्याचे सांगण्यात येते; मात्र याच सेनेच्या राज्यात श्रीरामाची पूजा करता येत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. पोलिसवाले आम्हाला घेऊन जात असल्याचा आरोपही सावे यांनी केला. तर भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, हे रामाचे राज्य नाही, निजामाचे राज्य आहे. त्यानंतर गजानन महाराज मंदिर चौकात श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. यासह गुलमंडी, उस्मानपुऱ्यातील भाजप कार्यालयात श्रीरामाचे पूजन करण्यात आले. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

यावेळी शिरीष बोराळकर, भगवान घडामोडे, भाऊराव देशमुख, दयाराम बसैये, लता दलाल, अनिल मकरिये, रामेश्वर भादवे, बालाजी मुंडे, दीपक ढाकणे उपस्थित होते. 

संपादन-प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena government no permission ram pooja