धक्कादायक..औरंगाबादेत सारीचे पावने तीनशे रूग्ण! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

रविवारी पुन्हा चार रुग्ण आढळून आल्याने सारीच्या रुग्णांचा आकडा २७५ वर पोचला असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आले. 

औरंगाबाद - कोरोनापाठोपाठ सारी आजार चिंता वाढवत आहे. रविवारी (ता. २६) चार नवीन रुग्णांची भर पडली. महिनाभरात सारीच्या रुग्णांची संख्या २७५ वर गेली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सारीच्या आजाराचे रुग्णदेखील दिवसेंदिवस वाढतच आहेत. सारीच्या आजाराने पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले. त्यानंतर सारीचे रुग्ण वाढतच आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

रोज पाच ते सात रुग्ण आढळून येत आहेत. सर्वाधिक रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल झालेले असून, घाटी रुग्णालयातही सारीचे रुग्ण निघाले आहेत. सारीच्या आजाराने आतापर्यंत १६ जणांचा बळी घेतला आहे. सारी आणि कोरोनाची लक्षणे सारखी असल्याने या रुग्णांची काळजी घेतली जात असून, कोरोना तपासणी केली असता त्यातून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तसेच २५४ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रविवारी पुन्हा चार रुग्ण आढळून आल्याने सारीच्या रुग्णांचा आकडा २७५ वर पोचला असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking Three Hundred patients of SARI in aurangabad