esakal | पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, फुलंब्रीत प्रहार संघटना आक्रमक 
sakal

बोलून बातमी शोधा

sholey aandolan.jpg

प्रहार कार्यकर्त्यांच्या प्रमुख तीन मागण्या आहे. यात शॉक लागून मयत झालेल्या रामेश्वर म्हस्के यांच्या वारसाला दहा लाखाची तात्काळ मदत करा, विद्युत वितरण कंपनीचा संबंधित कर्मचारी तात्काळ निलंबित करा, आणि शेतकऱ्यांना दिवसा विद्युत वीज द्यावी या मागण्यासाठी आंदोलन सुरू केलेले आहे.

पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, फुलंब्रीत प्रहार संघटना आक्रमक 

sakal_logo
By
नवनाथ इधाटे

फुलंब्री (औरंगाबाद) : तालुक्यातील कान्होरी येथे दोन दिवसापूर्वी रामेश्वर फकिरराव म्हस्के या तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष मंगेश साबळे व मयत रामेश्वर म्हस्के याचा भाऊ भाऊसाहेब म्हस्के यांनी चक्क गावातील पाण्याच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईलने आंदोलन नुकतेच केले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सदरील आंदोलक हे पाण्याच्या टाकीवर गेल्यानंतर जोरजोरात घोषणा देऊ लागल्याने परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर गावातील काही नागरिकांना सदरील आंदोलनाची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


या आंदोलन प्रहार कार्यकर्त्यांच्या प्रमुख तीन मागण्या आहे. यात शॉक लागून मयत झालेल्या रामेश्वर म्हस्के यांच्या वारसाला दहा लाखाची तात्काळ मदत करा, विद्युत वितरण कंपनीचा संबंधित कर्मचारी तात्काळ निलंबित करा, आणि शेतकऱ्यांना दिवसा विद्युत वीज द्यावी या मागण्यासाठी आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनात प्रहार संघटनेचा युवा तालुकाध्यक्ष मंगेश साबळे, मयताचा भाऊ भाऊसाहेब म्हस्के यांचा समावेश आहे.

(संपादन-प्रताप अवचार)