सिडकोतील भाजी मंडई तातडीने हटवा - नागरिकांची मागणी

Aurangabad News BHAJI MANDA
Aurangabad News BHAJI MANDA

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखावा तसेच सामाजिक अंतर राखले जावे, यासाठी जाधववाडी मंडईतील दैनंदिन बाजार जळगाव रस्त्यावरील आंबेडकर चौकात भरत आहे. मात्र, याठिकाणीही नियमांचे उल्लंघन होत असून गर्दी वाढली आहे. आरोग्याचे कारण देत भाजी विक्रेत्यांच्या विरोधात परिसरातील नागरिकांनी संबंधितांकडे फोनवरुन तक्रार केली आहे.

देशात लॉकडाऊन झाल्यानंतर सगळे रस्ते ओस पडले आहेत. जीवनावश्यक वस्तूंसाठी तुरळक गर्दी रस्त्यावर दिसते मात्र, याउलट जाधववाडी मंडई येथील स्थिती होती. अल्पदरात भाजीपाला, फळे मिळत असल्याने नागरिक याठिकाणीच गर्दी करत होते. म्हणूनच कृषी उत्पन्न बाजार समितीने जळगाव रस्त्यावरील आंबेडकर चौकात भाजी विक्रेत्यांना मार्किंग करून दिले होते. त्याठिकाणी शेतकरी आणि भाजीविक्रेते बसत होते. त्यांना सकाळी आठ वाजेपर्यंतच मुभा असतानाही दहा वाजेपर्यंत विक्री सुरूच राहते. सात ते दहा हजार लोकांची गर्दी होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गर्दीत कुणीही मास्क बांधत नाही. यामुळे आजूबाजूच्या सिडकोतील जी-वन. जी-टु, जी-थ्री, शास्त्रीनगर, आयोध्यानगर, ग्रीव्हज कॉलनी, वसुंधरा कॉलनी, आंबेडकरनगर येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. अशी तक्रार नागरिकांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे व्यक्त केली. त्यानंतर गणेश नावंदर, राहुल खरात, सचिन भोसले, हर्षल चिंचोळकर, प्रदीप ठाकरे, नीतू राठोड, सतीश खेडकर यांनी शनिवारी (ता.४) सकाळी पाहणी केली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलीस उपायुक्त, शहर अभियंता यांच्याशी संपर्क साधून नागरिकांचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचवले असल्याचे गणेश नावंदर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार, नागरिकांचे म्हणणे संबंधितांपर्यंत पोहोचवले आहे. बाजार समितीनेही त्यांच्याच जागेत बाजार भरवावा. तिथे भरपुर जागाही आहे.
- गणेश नावंदर 

 
ज्या उद्देशाने भाजी मंडई आंबेडकर चौकात आणली. तो उद्देशच असफल झाला आहे. याठिकाणी कोणतेही सामाजिक अंतर पाळले जात नाही, उलट येथील रहिवाशांना त्रास होत आहे.
- प्रफुल आवारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com