रात्री बॅंकेचा सायरन अचानक वाजू लागला, तेव्हा जे घडलेले होते ते पाहून सर्वच थक्क झाले.   

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

कुलूप सुरक्षित होते, पण रात्री अचानक बॅंकेतला सायरन वाजू लागला. आजूबाजूला असलेले लोक जागे झाले. तेव्हा जे घडलेले होते. ते सर्वांनाच थक्क करणारे होते. एका उंदराने सर्वांची हवा काढल्याचे समोर आले. तरीही रात्रभर नागरिकांसह बॅंक अधिकारी जागे होते. हा प्रकार घडला नाचनवेल येथे. 

 

नाचनवेल (औरंगाबाद) : उंदराचे कारनामे तसे सर्वज्ञात आहेत. धान्याची नासाडी करण्यात तर उंदरांचा हातखंडाच. पण एखाद्या उंदिराने बॅंकेचा सायरन वाजविला तर...! असाच प्रकार नाचनवेल येथे घडला.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
नाचनवेल (ता. कन्नड) येथील मुख्य रस्त्यावर सहकार बँक आहे. शनिवारी ( ता २१) रात्री अडीचच्या सुमारास बॅंकेतील सायरन वाजला. शेजारील नागरिक गोंधळले. काहीजण घराबाहेर आले. काही वेळाने सायरन बंद होताच पुन्हा झोपी गेले. त्यानंतर पुन्हा साडेपाचच्या सुमारास बँकेत सायरन वाजल्याने शेजारील नागरिक आणखी गोंधळात पडले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चोर शिरल्याच्या धास्तीने सर्वजण गोळाही झाले. कुलूप सुरक्षित असल्याचे पाहून अधिकारी. नागरिकांचा जीव भांड्यात पडला. परंतु, जीव मोकळा झाला. पण चोरटे पाठीमागून गेले तर नसतील अशा शंका कुशंका मनात येत होत्या. यावेळी बॅंक कर्मचारी बँक उघडण्यासाठी आले असता मोठा जमाव जमा झाला. अखेर बॅंक कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बॅंक उघडण्यात आली. पोलिसांनाही याची कल्पना देण्यात आलेली होती. पण बँक उघडताच सर्व सुरक्षित पाहून सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. यातील गंमतीची बाब म्हणजे, सायरान बॉक्समध्ये उंदरांची खडबड सुरू होती. त्यांच्या क्रीडांनीच हा सायरन वाजल्याचे सर्वांच्या लक्षात आले अन् सर्वांना हायसे वाटले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: siren suddenly sounded citizens and bank employees fell asleep