esakal | औरंगाबाद @६१६ दोन दिवसात १०८ पॉझिटिव्ह, आज सकाळी ५८ ने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

शहरात कोरोनाचा उद्रेक होत असून आज (ता.११) सकाळी तब्बल 58 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी (१० मे) रोजी ५० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. केवळ दोनच दिवसात 108 रुग्ण झाले असून एकूण रुग्णसंख्या 616 इतकी झाली आहे. अशी माहिती घाटी आणि जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली. केवळ १५ दिवसात ५४९ रुग्ण वाढले असून आधीच्या ४२ दिवसात ५३ रुग्ण होते.

औरंगाबाद @६१६ दोन दिवसात १०८ पॉझिटिव्ह, आज सकाळी ५८ ने वाढ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा उद्रेक होत असून आज (ता.११) सकाळी तब्बल 58 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी (१० मे) रोजी ५० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. केवळ दोनच दिवसात 108 रुग्ण झाले असून एकूण रुग्णसंख्या 616 इतकी झाली आहे. अशी माहिती घाटी आणि जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली. केवळ १५ दिवसात ५४९ रुग्ण वाढले असून आधीच्या ४२ दिवसात ५३ रुग्ण होते.

आतापर्यंत ७३ जण कोरोनामुक्त
शहरातील नूर कॉलनीतील दोन मुले, दोन महिला, एक पुरूष, चिकलठाणा एमआयडीसी, भीम नगर आणि संजय नगरातील प्रत्येकी एक पुरूष असे एकूण आठ कोविडबाधितांची कोविड चाचणी निगेटीव्ह आली. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) त्यांना आज सुटी देण्यात आली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनामुक्त झालेल्या या आठ जणांमुळे आतापर्यंत ७३ जण कोरोनामुक्त झाल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले. महापालिकेच्या कोविड केअर केंद्रांवरून १३ जण बरे झाल्याने त्यांना काल सुटी देण्यात आली. म्हणून कालपर्यंत एकूण ६५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यात आज पुन्हा आठजण कोरोनामुक्त झाल्याने ७३ जण कोरोनामुक्त झाले.

चोवीस तासात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

औरंगाबाद शहरातील रोशन गेट जवळील बायजीपुरा गल्ली क्रमांक तीन येथील ५० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रविवारी (ता. १०) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, किडनीचाही आजार होता. तर कोरोनामुळे औरंगाबादच्या रामनगर, मुकुंदवाडी येथील ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा रविवारी (ता. १०) मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. हा कोरोनाचा शहरातील चौदावा बळी ठरला आहे. चोवीस तासात कोरोनामुळे दोघांचे बळी गेले आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

उपचार घेत असलेले रुग्ण : ५१५
बरे झालेले रुग्ण : ७३
मृत्यू झालेले रुग्ण : १४
एकूण :  ६०२