esakal | वाह औरंगाबादकर.....आजही दिलासा, केवळ १६ रुग्ण एकूण @१३०१
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

Sixteen CoronaVirus Positive Patient Found Today Aurangabad News औरंगाबाद शहर आणि जिल्हा परिसरात सलग चौथ्या दिवशी रोजच्या सरासरीच्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. गत तीन दिवसात अनुक्रमे ३२ व ३०, ३७ रुग्णानंतर आज (ता.२५) केवळ १६ रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता  कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३०१ झाली आहे. सोमवारी (ता. २४) सकाळी आणि सांयकाळी एकूण दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता औरंगाबादेत एकूण ५० बळी कोरोना आणि इतर आजारामुळे गेले असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाह औरंगाबादकर.....आजही दिलासा, केवळ १६ रुग्ण एकूण @१३०१

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद: शहर आणि जिल्हा परिसरात सलग चौथ्या दिवशी रोजच्या सरासरीच्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. गत तीन दिवसात अनुक्रमे ३२ व ३०, ३७ रुग्णानंतर आज (ता.२५) केवळ १६ रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता  कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३०१ झाली आहे. सोमवारी (ता. २४) सकाळी आणि सांयकाळी एकूण दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता औरंगाबादेत एकूण ५० बळी कोरोना आणि इतर आजारामुळे गेले असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?
औरंगाबादेत कोरोनाचा पहिला रुग्ण १५ मार्चला आढळला. त्यानंतर २६ एप्रिलपर्यंत ५३ रुग्ण होते. २७ एप्रिलला एकाच दिवशी २९ रुग्ण आढळले. त्यानंतर रुग्ण वाढीचा वेग कायमच होता. आठ मे रोजी सर्वाधिक शंभर रुग्ण होते. यानंतरच्या सात दिवसांच्या काळात सर्वात जास्त ३६८ रुग्ण बाधित आढळले. २१ मे रोजी ६२ रुग्ण वाढल्यानंतर २२, २३ व २४ मे रोजी रुग्णसंख्या अनुक्रमे ३२, ३० आणि ३७ एवढी झाली. तर आज १६ रुग्ण वाढले.  रुग्ण वाढीचा वेग मंदावत असून ही दिलासादायक बाब आहे.

औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेले रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या)
सुभाषचंद्र बोस नगर, एन ११, हडको (४), भवानी नगर (२), रोशन गेट (१), हुसेन कॉलनी (१), बायजीपुरा (१), इटखेडा, पैठण रोड (१), अल्तमश कॉलनी (१), जवाहर नगर, गारखेडा परिसर (१), शाह बाजार (१), मयूर नगर, एन-६, सिडको (१), राम नगर, एन २ (१), गजानन मंदिर परिसर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १० महिला आणि सहा पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

४९ वा मृत्यू
सोमवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास न्याय नगर, एन-८ सिडकोतील ६३ वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना पूर्वीपासून उच्च रक्तदाबाचा आजार होता.

५० वा मृत्यू
५१ वर्षीय टाऊन हॉल येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा सोमवारी सांयकाळी चार वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना तीन आठवड्यापासून दम लागत होता. तसेच मधुमेहाचाही त्यांना त्रास होता. घाटीमध्ये आतापर्यंत ४५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयात ४ असे एकूण पाच कोरोनाबाधितांचाही मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ५० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत ६१९ रुग्ण झाले बरे
जिल्हा रुग्णालयातून आज २७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.  शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) सोमवारी सिल्क मिल कॉलनीतील २ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत जिल्ह्यातील ६१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर घाटीमध्ये ७९ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. यामध्ये दहा जणांची प्रकृती गंभीर, ६९ जणांची प्रकृती सामान्य आहे. एकूण ६३२ रुग्ण उपचार घेत आहेत.

असा आहे कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण            - ६१९
उपचार घेणारे रुग्ण        - ६३२
एकूण मृत्यू                 - ५०
जिल्ह्यातील एकूण रुग्ण - १३०१

हे वाचंलत का?- आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग