
औरंगाबाद ः बालभारती इयत्ता पाचवीच्या गणित विषयात ‘कोन’ या प्रकरणात चुकीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली जात आहे. याचे गांभीर्य ‘बालभारती’ला दिसत नाही. ‘कोन’ या प्रकरणात ज्या आकृत्या दिल्या आहेत, त्यामध्ये किरणांच्या शेवटी बाण दाखवणे अनिवार्य असते. परंतु पुस्तकामध्ये आवश्यक तेथे बाण दाखवलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
‘बालभारती’तर्फे तयार केलेल्या इयत्ता पाचवी इंग्रजी माध्यमाच्या गणिताच्या पुस्तकातील कोन या सहाव्या प्रकरणात चुका आढळल्या आहेत. पुस्तकातील पान क्रमांक ३४, ३५, ३६ व ३७ या चार पानांवर काटकोन, लघुकोन, विशालकोनाच्या आकृत्या दाखवण्यात आल्या आहेत. या आकृत्यांमध्ये दाखवलेल्या कोनाच्या शेवटी बाण दाखवणे अनिवार्य असते. मात्र, पुस्तकात दाखवलेल्या कोनाच्या आकृत्यांना कोठेही बाण दाखवलेला नाही.
दोन किरणांचा संयोग अशी कोनाची व्याख्या आहे; परंतु पुस्तकात दाखवलेल्या आकृत्यांमध्ये दोन रेषाखंडांचा संयोग दाखवण्यात आला आहे. हे प्रकरण सहावे असून इंग्रजी माध्यमाच्या पान नंबर ३४, ३५, ३६ व ३७ वर अशा कोनांच्या आकृत्या दाखवल्या आहेत. या चार पानांवर एकूण १६ आकृत्या आहेत. त्या सर्व चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत.
या पुस्तकाची २०१५ मध्ये पहिली आवृत्ती निघाली होती. पहिल्या आवृत्तीसाठी असलेल्या अभ्यास मंडळातील काही सदस्यांना याबाबत फोनवरून विचारणा केली असता, एका सदस्याने सांगितले की, आता अभ्यास मंडळ सदस्य बदलण्यात आले आहेत. असे असताना २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या आवृत्तीमध्येही जुन्याच अभ्यास मंडळ सदस्यांची नावे पुस्तकावर छापण्यात आली आहेत!
Sixteen Mistakes in the Fifth Grade Balbharati book Aurangabad
‘‘गेल्या पाच वर्षांपासून इयत्ता पाचवी इंग्रजी माध्यम गणिताच्या पुस्तकातील अँगल या प्रकरणात तब्बल १६ आकृत्या चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. त्या अद्याप दुरुस्त केलेल्या नाहीत. लहान मुलांना जे शिकवले जाते, तेच त्यांच्या मनावर कायमस्वरूपी बिंबवले जाते. चुकीचे संकल्प व ज्ञान मुलांना दिले जात आहे, ही बाब शासनाने गांभीर्याने घ्यावी.’’
- एस. पी. जवळकर (शिक्षणतज्ज्ञ)
‘‘इयत्ता पाचवी इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातील अँगल या प्रकरणात दाखवलेले कोन चुकीचे आहेत. आम्ही त्याचवेळी निदर्शनास आणून दिले होते. मात्र, ‘बालभारती’ने याकडे दुर्लक्ष केले.
- पुरुषोत्तम शर्मा ( माजी अभ्यास मंडळ सदस्य, बालभारती)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.