esakal | जीन्स, टी-शर्टला आता महापालिकेतही बंदी ; अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असेल ड्रेस कोड
sakal

बोलून बातमी शोधा

The state government has implemented a dress code for government employees in Aurangabad Municipal Corporation

यापूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड ठरवून दिला होता. मात्र डॉ. निपुण यांची बदली होताच ड्रेस कोडचा विसर पडला होता.

जीन्स, टी-शर्टला आता महापालिकेतही बंदी ; अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असेल ड्रेस कोड

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने ड्रेस कोड लागू केला आहे. त्या धर्तीवर महापालिकेने देखील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला असून, प्रशासनाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नियमित व कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स पँट व टी-शर्टचा पेहराव करता येणार नाही. तसेच प्रत्येक शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करावेत, असे आदेशात नमूद आहे.

हे ही वाचा : बनावट देशी दारू घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी यासंदर्भात काढलेल्या आदेशात नमूद केले आहे की, महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पेहराव शासकीय कर्मचाऱ्याला शोभनीय असावा. महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार, चुडीदार-कुर्ता, ट्राउझर पँट त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यक असल्यास दुपट्टा यासह पोशाख करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पँट, ट्राऊजर असा पेहराव करावा. गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्र असलेले पेहराव परिधान करु नये. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जीन्स, टी-शर्ट परिधान करून कार्यालयात येऊ नये. महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये चप्पल, बुटचा वापर करावा. पुरुष अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बूट, सँडल याचा वापर करावा. कार्यालयात स्लिपरचा वापर करू नये. ड्रेस कोडची अंमलबजावणी लगेच केली जाणार आहे. ड्रेस कोडच्या आदेशाची प्रत सर्व विभागप्रमुख, शाखा प्रमुखांना देण्यात आली आहे.

हे ही वाचा : धक्कादायक! कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या शरीरात झाला पस; जगातील सातवी, तर भारतातील पहिलीच केस 

दर शुक्रवारी खादीचे कपडे बंधनकारक

आठवड्यातून एक दिवस खादीचा पेहराव बंधनकारक करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव करावा. तसेच ओळखपत्र दर्शनी भागात लावावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही झाला होता प्रयोग

यापूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड ठरवून दिला होता. मात्र डॉ. निपुण यांची बदली होताच ड्रेस कोडचा विसर पडला होता.