
मात्र हे सत्य नाही, सत्य हे आहे की, हे विद्यापीठ औरंगाबादमध्येच होणार आहे. सध्या पुण्याच्या बालेवाडी येथे क्रीडाविषयक उपक्रम घेण्यासाठी सोयी सुविधा आहेत.
औरंगाबाद : क्रीडा विद्यापीठ हे औरंगाबादेतुन गेले हे सत्य नाही तर हे विद्यापीठ औरंगाबादेतच होणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी (ता.२५) पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, औरंगाबादेतील प्रस्तावित क्रीडा विद्यापीठी पुण्याला गेले असे सांगितले जात आहे.
धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया,‘मी राजकीय भांडवल केले नसते’
मात्र हे सत्य नाही, सत्य हे आहे की, हे विद्यापीठ औरंगाबादमध्येच होणार आहे. सध्या पुण्याच्या बालेवाडी येथे क्रीडाविषयक उपक्रम घेण्यासाठी सोयी सुविधा आहेत. अशा सोयीसुविधा औरंगाबादमध्ये तयार होईपर्यंत तिथल्या सुविधांचा उपक्रम राबविण्यासाठी फक्त उपयोग केला जात आहे. क्रीडा विद्यापीठ या जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मंजुर जागा संपादन करून त्यात वाढ केली जाईल. क्रीडा विद्यापीठ औरंगाबादमध्येच होईल याचा पुनरूच्चार त्यांना केला.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
विमानतळ विस्तारीकरणास भुसंपादन
औरंगाबाद येथील पर्यटन आणि उद्योगवाढीच्यादृष्टीने चिकलठाणा विमानतळाचे विस्तारीकरण गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्यासाठी १८२ हेक्टर अतिरिक्त जमीन लागणार आहे. ही संपादीत केली जाईल. जमीनीचे भुसंपादन हे शेतकऱ्यांच्या संमतीने केले जातात. मोबदल्यापोटी दिले जाणारे दर हेदेखील वाटाघाटीतुन ठरतील जनतेच्यावतीने केंद्र सरकारकडे राज्य सरकार मध्यस्थी करून दर वाटाघाटीने निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!
बालविवाह शुन्यावर आणू
जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढवण्यावर लक्षे केंद्रीत करण्यात येईल असे सांगुन त्यांनी जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी असून हे प्रमाण दर १००० पुरूषांमागे ९२३ इतके आहे. ते प्रमाण संतुलीत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील बालविवाह रोखणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात ३१ बालविवाह झाले आहेत हे प्रमाण शुन्यावर आणायचा असल्याचे त्यांनी सांगीतले. शहरात सध्या १०० स्मार्ट बसेस सुरू आहेत त्यात नव्याने ५० बसेसची भर टाकण्याचा नियोजन समितीच्या बैठकीत निरण्य घेण्यात आला आहे. शहरातुन वाहणारी खाम नदी अतिप्रदुषित झाली आहे तीचे पात्र स्वच्छ करून खामनदीकाठी लोकांना फिरायला जाता यावे अशा प्रकारे नदीचे पुनरूज्जीवन केले जाणार आहे.
२६५ कोटीच्या नियोजनाला मंजुरी
पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगीतले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२१ - २२ वर्षासाठी २६५ कोटी रूपयांच्या नियोजनाला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्याला अधिकाचा निधी मिळावा यासाठी ३६० कोटीचा वाढीव आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. वित्तीय मर्यादेनुसार ९४ कोटी वाढीव मागणी करण्यात आली आहे, यातुन जिल्ह्याच्या अर्थिक गरजा पुर्ण करणे शक्य होणार आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी ४ कोटी ६० लाखाची तर विशेष घटक योजनेसाठी १६ कोटी रुपयांची वाढीव मागणी प्रस्तावित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
संपादन - गणेश पिटेकर