esakal | पालकमंत्री सुभाष देसाई यांची नियोजित कोविड रुग्णालयास भेट 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City news

खबरदारीचा उपाय म्हणून चिलकळाणा भागात कोविड रुग्णालय उभारले जाणार आहे. त्या अनुशंगाने पालमंत्र्यांनी इमारतीची पाहणी आज पाहणी केली. या इमारतीत असलेल्या सोयी सुविधांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी श्री. देसाई यांना दिली.

पालकमंत्री सुभाष देसाई यांची नियोजित कोविड रुग्णालयास भेट 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता.१३) सकाळी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील सिपेट (केंद्रीय प्लॅस्टिक आणि अभियांत्रिकी संस्था) येथील इमारतीमध्ये सुरू केल्या जाणाऱ्या कोविड रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. 

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने भविष्यातील आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीची संभाव्यता लक्षात घेऊन, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून चिलकळाणा भागात कोविड रुग्णालय उभारले जाणार आहे. त्या अनुशंगाने पालमंत्र्यांनी इमारतीची पाहणी आज पाहणी केली. या इमारतीत असलेल्या सोयी सुविधांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी श्री. देसाई यांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची उपस्थिती होती. 

नव्या चार वसाहतीमध्ये रुग्ण 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असले तरी रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. दररोज नवीन वसाहतीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी सिडको एन-आठ, प्रकाशनगर, गांधीनगर, शहानूरमियाँ दर्गा या चार नवीन वसाहतीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने महापालिकेचे टेन्शन वाढले आहे. 

शहर मेअखेर कोरोनामुक्त करण्याचा संकल्प प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केला आहे; मात्र रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. कोरोनाची साखळी नव्या-नव्या भागात पोचत आहे. अनेक नवीन वसाहतींमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी सिडको एन-आठ, प्रकाशनगर, गांधीनगर आणि शहानूरमियाँ दर्गा या नवीन भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, तर सोमवारी कटकटगेट, अलंकार हॉटेल आणि यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या सिडको एन-चार भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

महापालिकेचा सफाई कामगारही पॉझिटिव्ह 
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेने टास्क फोर्स तयार केले आहे. या पथकासोबत मोबाईल स्वॅब टेस्टिंगची सुविधा असून, पथकामध्ये डॉक्टर, कर्मचारी, टेक्निशियन, पथकातील सदस्यांचा समावेश आहे. मात्र, या पथकातील लॅब टेक्निशियनला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पथकप्रमुख अपर्णा थेटे यांनी सांगितले. हा लॅब टेक्निशियन नारेगाव येथील रहिवासी असून, पथकामध्ये बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्याचे काम करतो.