#Youth_Inspiration : ऊसतोड कामगारांचा मुलगा झाला साहेब!

  मधुकर कांबळे 
रविवार, 12 जानेवारी 2020

दहावीत 72 टक्‍के मार्क घेऊनदेखील वाचता यायचे नाही अशी अनिल मुकिंदा सातपुते यांची अवस्था होती. अकरावीला औरंगाबादमध्ये मावशीकडे आला.

औरंगाबाद- सतत अवर्षणग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यातील बाभूळवाडी या छोट्याच्या वाडीतील एका ऊसतोड कामगाराचा मुलगा सात वर्षांच्या सततच्या परिश्रमानंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर नाशिक येथील भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेस (नोटांचा छापखाना) ज्युनिअर ऑफिस असिस्टंट म्हणून वयाच्या 26 व्या वर्षी नोकरीला लागला. युवकांसाठी आदर्श ठरेल अशीच अनिल मुकिंदा सातपुते यांची वाटचाल आहे. 

बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी गावे सोडतात. अनिल सातपुते यांचे आई-वडीलही ऊसतोडीच्या कामावर जायचे.

लहान मुलाचा कोण सांभाळ करेल, असा त्यांच्यापुढे प्रश्‍न असायचा. त्यातूनच त्यांनी अनिलला केज तालुक्‍यातील लिंबाची वाडी येथे त्याच्या मामाकडे ठेवले. तिथेच शालेय, माध्यमिक शिक्षण झाले. दहावीत 72 टक्‍के मार्क घेऊनदेखील वाचता यायचे नाही अशी त्याची अवस्था होती. अकरावीला औरंगाबादमध्ये मावशीकडे आला.

 क्‍लिक करा : मराठवाड्यातील सून चालते, जावयाला का आढेवेढे 

बारावीमध्ये 66 टक्‍के गुण मिळले. इंजिनिअरिंग करावे असे वाटले; पण टक्‍केवारी कमी पडल्याने इंजिनिअरिंगला जाता आले नाही. अनिल याने सांगितले, की खेड्यातून आल्याने मी एवढे टक्‍के मार्क घेऊनही अभ्यासात कच्चा होतो. अगदी वाचताही यायचे नाही.

बारावीनंतर ओळखीच्या व्यक्तीने "बोर्डेज करिअर ऍकॅडमी'चे प्रा. संतोष बोर्डे यांच्याकडे नेले आणि माझी संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगितील तेव्हा त्यांनी कसलेही शुल्क न घेता अगदी मोफत त्यांनी मला शिकविले. अभ्यासात एवढे टक्‍के गुण मिळवूनही सर्वसाधारणच होतो. एकदा त्यांनी मला क्‍लासमध्येच काही विद्यार्थ्यांचे आयकार्ड देण्यास सांगितले तर त्यावरचे इंग्रजीतील नावदेखील मला वाचता येत नव्हते.

ते सांगत अभ्यासात कोणता विद्यार्थी कसा आहे यापेक्षा तो कोणतीही स्पर्धा परीक्षा जिद्द असेल तर पास करू शकतो, असा त्यांनी माझा आत्मविश्‍वास वाढविला. मला तिथेच बसवून रोज सात ते आठ तास माझ्याकडून अभ्यास करून घ्यायचे. कॉलेजचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बरोबरच चालायचा. 

हे वाचा : कुलगुरु डॉ. प्रमोद येवले फार्मास्युटिकल बोर्डच्या अध्यक्षपदी 

ध्येय असेल तर साध्य करणे सोपे 

अनिल सातपुते एकीकडे परीक्षेची तयारी आणि दुसरीकडे जमेल तशा स्पर्धा परीक्षा देत होते. जवळपास 20 ते 25 स्पर्धा परीक्षा दिल्या. त्यापैकी पाच ते सहा परीक्षा पासही झालो, अखेर अपेक्षित परीक्षेत यशस्वी झालो. आयबीपीएसच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अखेर 2018 मध्ये ते स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले.

 वयाच्या 26 व्या वर्षी नाशिक येथील भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेसमध्ये ज्युनिअर ऑफिस असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. बी.एस्सी. झाली आणि त्याचवर्षी मी नाशिक येथे नोकरीत रुजू झालो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरवातीपासून करावी. ध्येय असले पाहिजे की मला काय करायचे आहे. समोर एक ध्येय असेल तर ते ऍचिव्ह करणे सोपं जातं. गोल ठरवता येत नसेल तर जमेल तेवढ्या परीक्षा देत राहावे. त्यातून आपल्यातील क्षमता लक्षात येतील आणि गोल निश्‍चित करण्यास मदत होईल. 

 क्‍लिक करा : मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story of Workers Son