कुलगुरु डॉ. प्रमोद येवले फार्मस्युटिकल बोर्डच्या अध्यक्षपदी

अतुल पाटील
शनिवार, 11 जानेवारी 2020

औरंगाबाद : ऑल इंडिया फार्मस्युटिकल बोर्डच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औषधनिर्माणशास्त्र या विषयातील देशातील ही सर्वोच्च संस्था असून "एआयसीटीई'तर्फे आगामी तीन वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

औरंगाबाद : ऑल इंडिया फार्मस्युटिकल बोर्डच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औषधनिर्माणशास्त्र या विषयातील देशातील ही सर्वोच्च संस्था असून "एआयसीटीई'तर्फे आगामी तीन वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) तर्फे औषधीनिर्माण शिक्षण व संशोधन करणाऱ्या संस्थासाठी सदर बोर्ड गठीत करण्यात आले आहे. देशभरातील ज्येष्ठ औषधीनिर्माण शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जानेवारी 2020 ते 2023 या तीन वर्षांसाठी 15 सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत, सदस्य सचिव प्रा. राजीव कुमार, डॉ. निरज सक्‍सेना यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

गेल्या महिन्यात कुलगुरु डॉ. चोपडे यांना चेन्नई येथे आयोजित 71 व्या इंडीयन फार्मास्युटिकल कॉग्रेसतर्फे प्रा. जी. पी. श्रीवास्तव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नियुक्तीबददल प्र-कुलगुरु डॉ. प्रविण वक्‍ते, कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी कुलगुरुंचे अभिनंदन केले.

हेही वाचा - " कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या खंबीर पाठबळावर आपण विद्यापीठ व बोर्ड दोन्हीकडे सक्षमपणे काम करु. विद्यापीठाने आता प्रगतीचा दिशेने पावले उचलली असून सर्वांचे सहकार्य लाभत आहे. नियुक्तीमुळे काम करण्याची ऊर्जा व जबाबदारीची जाणीव निश्‍चितच वाढली आहे, असे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले.

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

डॉ. येवले हे गेल्या 38 वर्षापासून औषधीनिर्माणशास्त्र क्षेत्रामध्ये कार्यरत असून शिक्षण व संशोधनाचा दर्जा राष्ट्रीय स्तरावर वाढविण्याच्या दृष्टीने त्यांचे मोलाचे योगदान आहे. एक शिस्तप्रिय व उत्कृष्ट प्रशासक म्हणुन त्यांचा नावलौकीक आहे. वर्धा येथील औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये 1982 मध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्याच महाविद्यालयात प्राचार्य म्हणुन नियुक्त झाले.

हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये प्र-कुलगुरु म्हणुन कार्यरत असताना परीक्षा पध्दतीमध्ये तसेच आचार्य पदवीचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी आमुलाग्र बदल घडवून आणले. शिक्षणक्षेत्रामध्ये या बाबतचा येवले पॅटर्न म्हणून प्रसिध्द आहे. डॉ. येवले यांना या पूर्वीही अनेक विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य पुरस्कार, इंडियन सोसायटी ऑफ टेक्‍ननिकल एज्युकेशन, दिल्ली यांचा राजारामबापु पाटील तांत्रिक शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार, ऑल इंडिया फार्मास्युटिकल टिचर्स ऑफ इंडिया या संस्थेचा उत्कृष्ट प्राचार्य या पारितोषिकाचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vice Chancellor Dr Pramod Yeole appointed as Chairman of Pharmaceutical Board