esakal | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी : कापूस खरेदीबाबत प्रशासन म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Suggestions for Purchase of Cotton
  • १ तारखेपर्यंत चार लाख क्विंटल कापूस खरेदी करा
  • जिल्हाधिकाऱ्यांची जिनिंग व्यवस्थापकांना सूचना 

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी : कापूस खरेदीबाबत प्रशासन म्हणाले...

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५.५० लाख खरेदी विना पडून आहे. जिल्ह्यातील जिनिंग सुरू करून कोणत्याही परिस्थितीत ३१ मे पर्यंत चार लाख कापूस खरेदी करा अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शुक्रवारी (ता.१५)जिनिंग व्यवस्थापकांना दिल्या. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेडे यांनी दिली.

कापूस खरेदी न करणाऱ्या जिल्ह्यातील २० जिनिंगच्या व्यवस्थापकास जिल्हा  प्रशासनातर्फे नोटिसा देण्यात आल्या होत्या. या नोटिसांची उत्तर १५ मेपर्यंत मागवण्यात आले होते त्याच संदर्भात जिल्हाधिकारी व जिनिंग व्यवस्थापक यांच्यात बैठक झाली. या बैठकीत जिनिंगच्या व्यवस्थापकांनी इनिंग सुरू करण्याविषयी येत असलेल्या विविध अडचणी चा पाढा जिल्हाधिकारी भारतीय कापूस निगम(सीआयआय) व राज्य कापूस महासंघ यांच्यासमोर वाचून दाखविला.

असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत ३१ मेपर्यंत चार लाख क्विंटल कापूस खरेदी करा, परप्रांतीय कामगार नसेल तर स्थानिक मजुरांकडून जिनिंग प्रेसिंगचे काम करून घ्या, सीआयडी आपली जबाबदारी टाकू नयेत, कन्नड ची जिनिंग दोन दिवसाच्या आत सुरु करा सीआयए या जिनिंग व उद्यापासून खरेदी सुरुवात करावी अशी स्पष्ट सूचना ही जिल्हाधिकाऱ्यांनी जिनिंग व्यवस्थापक व सीआयडीला दिली. पाचोड तालुका पैठण येथील जिनिंग-प्रेसिंग दोन दिवसाच्या सुरू करावी अन्यथा ती जिनिंग अधिगृहीत धरण्यात येईल. याठिकाणी सीसीआयने खरेदी सुरू करावी. 

हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...

कापूस शेतकऱयांचाच का? खात्री करा
भारतीय कापूस निगमवर राज्य कापूस महासंघचे ग्रेडरन यांनी जिनिंगला येणारा कापूस हा शेतकऱ्यांचाच आहे का याची खात्री करावी. सीआयडीने वाघलगाव तालुका गंगापूर येथील जिनिंग चालू करावी, उपविभागीय अधिकारी यांनी या जिनिंगला भेट देत संमती बाबत चर्चा करावी व सीआयएने निविदा बाबत तीन दिवसांत प्रक्रिया करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

याच सिल्लोड येथील दोन जिनिंग सुरू करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेट द्यावी व याबाबत अहवाल सादर करावा तसेच जिनिंगची लाईट जाणार नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरण'ला ही सूचना केल्या आहेत, असेही जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी सांगितले.