चोरलेला टेंपो बंद पडला म्हणुन यांनी काय केल वाचा... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

चोरीचा टेंपो नेताना जळगाव रस्त्यावरील वाणेगाव फाट्यावर बंद पडला. त्यामुळे दोघांनी टेंपो दवंगेच्या शेतात उभा केला. यानंतर शहरात येण्यासाठी वाणेगाव फाट्यावरील एका हॉटेलसमोरील शेषराव लगड (रा. फुलंब्री) यांची दुचाकी 24 डिसेंबरला चोरून त्याद्वारे शहरात आले. 

औरंगाबाद - टेंपो, दुचाकी चोरीसह घरफोडी करणाऱ्या दोघांना जिन्सी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी टेंपो व दुचाकी हस्तगत केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता.27) करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सचिन सुधाकर दवंगे पाटील (वय 27) व उमेश देविदास मुळे (45, दोघे रा. कैलासनगर) अशी संशयितांची नावे आहेत. चोरलेला टेंपो नेताना ते दोघेही हर्सूल टोलनाक्‍याच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. त्यावरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. 

कैलासनगर येथील सिमेंट विक्रेता संदीप किशोर सरीन (34) यांनी अडीच वर्षांपूर्वी सिल्लोड तालुक्‍यातील रफिक देशमुख यांच्याकडून टेंपो (एमएच-20, बीटी-1287) खरेदी केला होता. हा टेंपो त्यांनी 23 डिसेंबरला कैलासनगर येथील स्मशान मारुती मंदिरासमोर उभा केला असता त्यांचा टेंपो दवंगे व मुळेने लांबविला. याप्रकरणी सरीन यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानुसार, जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांनी शहरातील नजीकच्या टोलनाक्‍यांची तपासणी केली. तेव्हा हर्सूल टोलनाक्‍यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघेही कैद झाले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत अटक केली.

हेही वाचा : असा गेला सहा जणांचा जीव, एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात 

टेंपो बंद पडला म्हणून... 
चोरीचा टेंपो नेताना जळगाव रस्त्यावरील वाणेगाव फाट्यावर बंद पडला. त्यामुळे दोघांनी टेंपो दवंगेच्या शेतात उभा केला. यानंतर शहरात येण्यासाठी वाणेगाव फाट्यावरील एका हॉटेलसमोरील शेषराव नारायण लगड (रा. फुलंब्री) यांची दुचाकी 24 डिसेंबरला चोरून त्याद्वारे शहरात आले. 

नंतर पुन्हा घरफोडी 
जवाहर कॉलनीतील भानुदासनगरात 22 डिसेंबरला या जोडगळीने बालिका ढाकणे यांचे घर फोडून सोन्याचे दागिने लांबविले होते. ही बाब त्यांच्या चौकशीतून समोर आली. त्यांनी या सर्व गुन्ह्यांची कबुलीही दिली. त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

हेही वाचा : तिने केला कॉल नंतर आला मॅसेज आणि घडले काय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The suspect arrested,