ते शिक्षक मोठ्या धीराने तोंड देत होते, पण शेवटी झाडाला गळफास घेत संपविली जीवनयात्रा (वाचा कशामुळे)

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

करमाड (जि. औरंगाबाद) : कर्करोग असह्य झाल्याने एका शिक्षकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंजनडोह (ता.औरंगाबाद) येथील एका शेतशिवारात शनिवारी (ता.एक) सकाळी समोर आली. नाना भागाजी गाडेकर (47, रा. गिरसावळी ता. फुलंब्री) (हल्ली मुक्काम होनाजी नगर, जटवाडा, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

हेही वाचा-  दुसऱ्यांपुढे हात पसरण्यात हरवतेय बालपण

करमाड (जि. औरंगाबाद) : कर्करोग असह्य झाल्याने एका शिक्षकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंजनडोह (ता.औरंगाबाद) येथील एका शेतशिवारात शनिवारी (ता.एक) सकाळी समोर आली. नाना भागाजी गाडेकर (47, रा. गिरसावळी ता. फुलंब्री) (हल्ली मुक्काम होनाजी नगर, जटवाडा, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

हेही वाचा-  दुसऱ्यांपुढे हात पसरण्यात हरवतेय बालपण

श्री. गाडेकर हे फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. मागील काही महिन्यांपुर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. तरीही ते डगमगले नाही. तथापि, काही महिन्यांत या रोगाने त्यांना चांगलेच ग्रासले. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची मानसिक स्थिती ढासळत चालली होती. त्यातच काही दिवसांपासून तर त्यांना हा रोग असह्य झाल्याने ते पूर्णतहा परावलंबी बनले होते. यातच ते गुरूवार (ता.30 जानेवारी) पासुन
घरातुन बेपत्ता झाले होते. तेंव्हापासुन घरातील सदस्य त्यांची सर्वत्र शोधाशोध करीत होते.

हेही वाचा-मी भारतात राहूनच देशासाठी संशोधन करेन म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली नासाची ऑफर नाकारणारा तरुण सोशल मिडीयावर झालाय व्हायरल 

शेवटी, शनिवारी (ता.एक) त्यांच्या गिरसावळी गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनडोह शिवारातील गट नंबर 107 मधील एका कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. श्री.गाडेकर यांनी स्वतः च्या सदर्‍याने गळफास घेत ही आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या पॅन्ट च्या खिशात एक चिठ्ठी आढळली. यात त्यांनी, मला कर्करोग असह्य झाल्याने आत्महत्या करीत आहे, यास कोणासही जबाबदार धरण्यात येऊ नये असा मजकूर असल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले. मृतदेहावरून शुक्रवारी रात्री त्यांनी हा गळफास घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या घटनेने शिक्षक वर्गात खळबळ उडाली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील हे करीत आहेत.

हे वाचलंत का?- त्यांनी सापळा लावलाच होता, तोही अलगद अडकला जाळ्यात (वाचा नेमंक काय घडलं)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher suscide in Aurangabad district