शासनाच्या मदतीला शिक्षकही सरसावले 

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
Updated on

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. या संकटातून निघण्यासाठी संचारबंदी पुरेशी नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांना शोधणे, चाचणी घेणे, बाधित रुग्णांचे विलगीकरण, त्यांच्यावरील उपचारासाठी शासनास मोठा खर्च येणार आहे. 

त्यामुळे आपले एक दिवसाचे वेतन मदत निधी म्हणून देण्याची तयारी राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दाखविली आहे. एवढेच नव्हे तर सर्वच शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करावे, अशी मागणीही समितीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

निवेदनात म्हटले, ग्रामीण भागातील शाळांत पोषण आहार शिजविण्याची काम करणारे स्वयंपाकी आणि मदतनीसांची परिस्थिती हालाखीची असते. मुळातच त्यांना मिळणारे दीड हजार रुपये मासिक मानधन अत्यंत कमी आहे. सध्या प्राथमिक शाळांना सुट्या असल्याने पोषण आहार बंद आहे. ज्याप्रमाणे कारखाने, उद्योगधंदे, दुकानात काम करणाऱ्या मजुरांना सुटी कालावधित वेतन देण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. त्याप्रमाणेच शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनिसांनाही सुटीच्या कालावधी नियमित मानधन द्यावे. 

शाळांना असणाऱ्या सुट्यांमुळे शाळेत पोषण आहाराचे धान्य आणि धान्यादी वस्तू शिल्लक आहेत. कीड, उंदरांचा प्रादुर्भाव आणि मुदत संपण्याच्या कारणामुळे या धान्यादी वस्तू खराब होतील. ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रामुख्याने गोर-गरीब, शोषित-वंचित, कष्टकरी, शेतकरी-शेतमजुरांच्या परिवारातील आहेत. त्यामुळे शाळांत शिल्लक असणारे धान्य आणि धान्यादी वस्तू विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश शासनाने काढावेत.
 मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा


सुट्यांमुळे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत २०१९-२०२० साठी शाळांना मिळालेले अनुदान अखर्चित राहण्याची स्थिती आहे. त्यामुळे हे अखर्चित राहणारे अनुदान पुढील वर्षात खर्च करण्याची परवानगी द्यावी; तसेच २०२०-२०२१ साठी मिळणाऱ्या अनुदानातून सध्याचे अखर्चित अनुदान वजा न करता पूर्ण अनुदान देण्यात यावे, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. 

निवेदनावर समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, सरचिटणीस विजय कोंबे, राजन कोरगावकर, काळूजी बोरसे-पाटील, शिवाजीराव साखरे, राजेंद्र नवले, वर्षा केनवडे, केदू देशमाने, सयाजी पाटील, शिवाजी दुशिंग, राजेंद्र खेडकर, आबा शिंपी, राजेश सावरकर, राजेंद्र पाटील, सुधाकर सावंत, नाना नाकाडे, अशोक वैद्य, नरेंद्र गाडेकर, दिनकर उरकांदे, महेंद्र भुते, रामदास खेकारे, मनीष ठाकरे, गोकुळदास राऊत, लीलाधर ठाकरे, धनपाल मिसार, मारोती वरोकार, विनोद घुगे, कालिदास येरगुडे, मनोज दीक्षित, मोहन पडोळे, अनिल पवार आदींच्या सह्या आहेत.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com