...तर औरंगाबादेत १५ दिवस कडक लॉकडाउन

राजेभाऊ मोगल
शनिवार, 27 जून 2020

लॉकडाउनचा मोठा कालावधी लोटल्यानंतर त शिथिलता देण्यात आली. त्यानंतर उद्योगासोबतच अनेक दुकानेही सुरू झाले; मात्र कोरोनाबाबत काळजी घेण्याबाबत काही उद्योगांचा प्रतिसाद मिळत नाही. एका बड्या उद्योगामध्ये शंभरपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत.

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मोठ्या कंपन्यांमधील कामगारही बाधित होत आहेत. सांगूनही लोकांनी ऐकले नाही, नियम पाळले नाहीत, विलगीकरण कक्षाऐवजी होम क्वारंटाइन सुरू केले. असेच सुरू राहिले तर कडक लॉकडाउन करावा लागेल, असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

लॉकडाउनचा मोठा कालावधी लोटल्यानंतर त शिथिलता देण्यात आली. त्यानंतर उद्योगासोबतच अनेक दुकानेही सुरू झाले; मात्र कोरोनाबाबत काळजी घेण्याबाबत काही उद्योगांचा प्रतिसाद मिळत नाही. एका बड्या उद्योगामध्ये शंभरपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. विलगीकरणही त्यांचे त्यांनाच करावे लागणार आहे. येत्या काळात लहान-मोठ्या उद्योगांनी याबाबत काळजी घेतली नाही, प्रतिसाद दिला नाही तर प्रसंगी औरंगाबाद शहरासह वाळूजमधील उद्योगही १५ दिवस बंद करावे लागतील, असे श्री. केंद्रेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

तीन ते पाच जूनदरम्यान नियमांचे पालन करण्याच्या अटीवर शहरात टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरू करण्यात आले. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळाले. ते गरजेचेही होते. मात्र, कोरोनाचा धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीणमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. शहर परिसरात असलेल्या उद्योगांनाही नियम व अटींच्या आधारावर उद्योग सुरू करण्याची परवानगी मिळाली; मात्र वाळूजमधील मोठ्या कंपन्यांमधील कामगारांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ  

याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत केंद्रेकर म्हणाले, की उद्योगांनाही कोरोना नियंत्रणासंदर्भात काळजी घ्यावी लागेल. वाळूजसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे; तसेच सहायक आयुक्त शिवाजी शिंदे हे दोन अधिकारी नियुक्त केले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काय काय उपाययोजना करायला हव्यात, याबाबत हे अधिकारी निर्णय घेतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Then 15 Days Strict Lockdown In The Aurangabad City