esakal | चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळविले! पैठणरोडवरील घटना   
sakal

बोलून बातमी शोधा

atm.jpg

दिवाळीच्या काळात आणि दिवाळी संपताच औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. अर्थात क्राईम रेट वाढत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र आहे. वाढत्या चोरी आणि दरोडेखोरीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये तर चोरट्यांनी हद्दच केली. एटीएम फोडून चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या चोरांना एटीएम मशीन फोडता आले नसावे, त्यामुळे त्यांनी चक्क एटीएम मशीनचीच चोरी केली आहे.

चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळविले! पैठणरोडवरील घटना   

sakal_logo
By
विनोद शहाराव

ढोरकीन (औरंगाबाद) : औरंगाबाद-पैठण रोडवर असलेल्या ढोरकीन (ता.पैठण) येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या इंडिया बॅंकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळविले आहे. पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरांना एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे चोरांनी चक्क एटीएम मशीनच चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (ता.१९) मध्यरात्री घडली. घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील या आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाबंरे यांनी देखील घटनास्थळी दिली. तपासाबाबत जातीने लक्ष घाला असे आदेश दिले आहेत.   

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दिवाळीच्या काळात आणि दिवाळी संपताच औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. अर्थात क्राईम रेट वाढत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र आहे. वाढत्या चोरी आणि दरोडेखोरीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये तर चोरट्यांनी हद्दच केली. एटीएम फोडून चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या चोरांना एटीएम मशीन फोडता आले नसावे, त्यामुळे त्यांनी चक्क एटीएम मशीनचीच चोरी केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मागच्या वर्षी याच एटीएमची झाली होती चोरी 
एक वर्षांपूर्वी याच ठिकाणचे एटीएम मशीन चोरी गेल्याचे सांगण्यात येत आहे. कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापण्यात आले होते. त्यातील रक्कम काढून ढोरकीन पासून जवळच असलेल्या ओढ्यात फेकून देण्यात आले होते. मागील वर्षी अशी घटना होऊन देखील येथील सुरक्षेची दक्षता घेण्यात आली नाही.  

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सुरक्षारक्षकाची नियुक्ती नाही  
मागील वर्षी याच ठिकाणचे एटीएम मशीन कटर कापून नेण्यात आले होते. विशेष म्हणजे अद्यापही त्या चोरीचा तपास लागलेला नाही. एटीएम मशीन मात्र सापडले होते. मागच्या वर्षीच्या या प्रकारानंतर देखील बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु झाल्य़ा आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)