Corona:औरंगाबादेत आज वाढले ३५ रुग्ण, एकूण १३९७ पॉझिटिव्ह

मनोज साखरे
गुरुवार, 28 मे 2020

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना आणि इतर आजारांचे बळींचे सत्र थांबता थांबत नसून पुन्हा यात मकसूद कॉलनी, इंदिरानगर बायजीपुरा,  हुसेन कॉलनी, माणिकनगर गारखेडा, रोशनगेट, रहिमनगर परिसरातील सहा जणांचे २६ व २७ मे रोजी कोरोना आणि इतर आजाराने बळी गेले.

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना आणि इतर आजारांचे बळींचे सत्र थांबता थांबत नसून पुन्हा यात मकसूद कॉलनी, इंदिरानगर बायजीपुरा,  हुसेन कॉलनी, माणिकनगर गारखेडा, रोशनगेट, रहिमनगर परिसरातील सहा जणांचे २६ व २७ मे रोजी कोरोना आणि इतर आजाराने बळी गेले. त्यामुळे औरंगाबादेतील एकूण मृत्यू ६५ झाले आहेत. औरंगाबादेत सलग सातव्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येतही  कमालीची घट दिसून आली. आज (ता. २८) ३५ रुग्ण वाढले.

क्लिक करा: सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

गत सहा दिवसात अनुक्रमे ३२ व ३०,  ३७,  २०, ३० व ३२ रुग्ण आढळल्यानंतर गुरुवारी ( ता.  २८)  ३५ रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  जिल्ह्यात आता  कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार ३९७ झाली. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  विशेषतः पूर्वीपेक्षा टेस्टिंग कमी होत असून दुसरीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  

औरंगाबादमध्ये आज आढळलेले रुग्ण
(कंसात रुग्ण संख्या) - बायजीपुरा (१), मिसारवाडी (१), वाळूज महानगर एक, बजाज नगर (१), संजय नगर (१),  शहागंज (१),  हुसेन कॉलनी (१), कैलास नगर  (१), रोकडिया हनुमान कॉलनी (२), उस्मानपुरा (१), इटखेडा (१),  एन-४ (३), नारळीबाग (२), हमालवाडी (४), रेल्वे स्टेशन परिसर (२), सिटी चौक (१), नाथ नगर (१), बालाजी नगर (१), साई नगर एन सहा (१), संभाजी कॉलनी, एन सहा (२), करीम कॉलनी रोशन गेट (१) अंगुरी बाग (१), तानाजी चौक, बालाजी नगर (१), एन -११ हडको (१), जय भवानी नगर (२), अन्य (१) या भागातील कोरानाबाधित आहेत.

असा आहे कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण            - ८३१
उपचार घेणारे रुग्ण        - ५०१
एकूण मृत्यू                 - ६५
एकूण रुग्णसंख्या       - १३९७

हेही वाचा:शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirty Five CoronaVirus Positive Patient Found Today Aurangabad News