esakal | औरंगाबादेत कोरोनाचा ३२ वा बळी, ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus.

शहरातील मदनी चौक येथे राहणारे ६५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात कोविड -१९ आणि इतर व्याधींमुळे १७ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. या रुग्णाला कोरडा खोकला आणि ताप होता. त्यांना कटकटगेट येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

औरंगाबादेत कोरोनाचा ३२ वा बळी, ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : शहरातील मदनी चौक येथे राहणारे ६५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात कोविड -१९ आणि इतर व्याधींमुळे १७ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. या रुग्णाला कोरडा खोकला आणि ताप होता. त्यांना कटकटगेट येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

१३ मे रोजी त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना १६ मे रोजी घाटी रुग्णालयात सायंकाळी पाचच्या सुमारास भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अतिदक्षता कक्षात भरती करण्यात आले त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.

सर्व प्रकारचे अतिदक्षता उपचार करण्यात येत असताना १७ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता अशी माहिती घाटी रुग्णालयातील डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी दिली. ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनाचा शहरातील ३२ वा बळी ठरला आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वेदनादायी... औरंगाबादेत @ १०२१ कोरोना रुग्ण  
औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नको असलेले संकट शहरात अधिकच घोंघावताना दिसत आहे. आज औरंगाबादने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा एक हजारांचा टप्पा ओलांडला. सोमवारी (ता.१८) सकाळी ५९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ हजार २१ झाली. कोरोनाचा एक हजारांवर रुग्णांना संसर्ग अत्यंत वेदनादायी ही बाब असून मराठवाड्यातही रुग्णसंख्या वाढती असल्याने हे चिंताजनक आहे. त्यामुळे समस्त औरंगाबाद आणि मराठवाडावासियांनी काळजी आणि जबाबदारी घेण्याची गरज आहे.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा