अन्नवाटप करणाऱ्यांनी अशी घ्यावी खबरदारी

राजेभाऊ मोगल
शनिवार, 28 मार्च 2020

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील इस्कॉनच्या किचनमध्ये अन्न वितरकांना डॉ. गुप्ता यांनी शनिवारी (ता. २८) मार्गदर्शन केले. कोरोनापासून स्वतः व इतरांचा बचाव करण्यासाठी डॉ. गुप्ता यांनी अन्न वितरकांना सहा प्रमुख मंत्र दिले.

औरंगाबाद : कोरोना विषाणूने जगभरात आपले हातपाय पसरलेले आहेत. भारतात येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे महामारीसह उपासमारीची वेळ लोकांवर येऊन नये. त्यासाठी इस्कॉन अन्नामृततर्फे दररोज २० हजार गरजूंना विविध व्यक्ती, संस्थांच्या माध्यमातून अन्नवाटप केले जात आहे. अन्नवाटप करतांना आपणही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असे मत धूत हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. हिमांशु गुप्ता यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा : बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान 

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील इस्कॉनच्या किचनमध्ये अन्न वितरकांना डॉ. गुप्ता यांनी शनिवारी (ता. २८) मार्गदर्शन केले. कोरोनापासून स्वतः व इतरांचा बचाव करण्यासाठी डॉ. गुप्ता यांनी अन्न वितरकांना सहा प्रमुख मंत्र दिले. पहिला मंत्र म्हणजे तुम्ही अन्न वितरण करण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहात हे कुटूंबातील सदस्यांना आवर्जून सांगा. त्यामुळे तुम्ही जेव्हा घरी परत जाणार तेव्हा कुटूंबातील सदस्य तुमच्या स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी सज्ज असतील. 

हेही वाचा : गुढीऐवजी उभारा भगवी पताका  

प्रामुख्याने घरी घेल्याबरोबर तुमचे सर्व कपडे निर्जंतूकीकरण पाण्यात टाकून ठेवा व काही वेळानंतर धुवा. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही घराबाहेर निघण्यापूर्वी तुमच्यासोबत गरम पाण्याची बाटली सोबत बाळगावी. जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा ती तुम्हाला उपयोगी पडेल. तिसरा बाब म्हणजे गरजूंना अन्नवाटप करतांना तुमच्यापासून इतरांमध्ये किमान चार ते पाच फूट इतके अंतर ठेवा. चौथी सर्वात महत्त्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही अन्न वितरीत करतांना कापडी मास्क अथवा दोन घड्या केलेला रुमाल तोंडाला आवश्यक बांधा. त्याशिवाय तुमचे डोके, हात आणि पाय पूर्णतः झाकले जातील, असे कपडे वापरावे. 

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

पाचवा प्रमुख मंत्र म्हणजे तुम्ही तुमचे हात वारंवार साबण, हँडवॉश अथवा सॅनिटायझरने स्वच्छ करा. घरी गेल्यानंतर तुमची कार पार्क करण्यापूर्वी दारे व खिडक्या बंद करून गरम हिटर चार ते पाच मिनीटे सुरु ठेवा. त्यानंतर थेट बाथरुममध्ये जाऊन कपडे व्यवस्थित निर्जंतूक करून गरम पाण्याने आंघोळ करा, मगच कुटूंबामध्ये सामील व्हा, असे आवाहन त्यांनी केले. 

हेही वाचा : कोरोनामुळे मिळेना शालेय पोषण आहार..

यावेळी डॉ. सुशील भारुका, राजेश भारुका, डॉ. संतोष मद्रेवार, राजन नाडकर्णी,विशाल लदनिया, आनंद भारुका, रविंद्र करवंदे, राघवेंद्र बगडिया, दिलीप अग्रवाल, विजय अग्रवाल, प्रफुलकुमार अग्रवाल, डॉ. हिमांशू गुप्ता, सुदर्शन पोटभरे, बी.एस. राजपाल, सुशील धूत, शेख हबीब आदींसह असंख्य संस्था, व्यक्ति परिश्रम घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Those who partake of food should take such precautions

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: